ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी दाराजवळ दिवा लावण्याची प्रथा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 26, 2019 09:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी दाराजवळ दिवा लावण्याची प्रथा

शहर : मुंबई

दिवाळी (27 ऑक्टोबर)ला दिवे लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावल्याने धार्मिक तसेच आरोग्य लाभही होतात.  दिवा लावताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. येथे जाणून घ्या, दिव्याशी संबंधित काही खास गोष्टी...

 

1. दिवा लावताना खालील मंत्राचा उच्चार अवश्य करावा.

 

मंत्र - शुभम करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदाम् शत्रु बुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।

 

या मंत्राचा सोपा आणि सरळ अर्थ : शुभ आणि कल्याण करणाऱ्या, आरोग्य आणि धन संपदा देणाऱ्या, शत्रू बुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करू देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो.

 

2. देवी-देवतांसमोर तुपाचा दिवा आपल्या डाव्या बाजूला लावावा आणि तेलाचा दिवा उजव्या हाताकडे लावावा.

 

3. पूजा पूर्ण होईपर्यंत दिवा विझणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. दिवा विझल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. दिवा चुकून विझल्यास लगेच लावावा आणि देवाकडे क्षमायाचना करावी.

 

4. घरामध्ये नियमितपणे दिवा लावल्यास नेहमी सकारात्मक ऊर्जा कायम राहते. दिव्याच्या धुराने वातावरणामध्ये उपस्थित हानिकारक सूक्ष किटाणू नष्ट होतात.

 

5. शास्त्रानुसार रोज संध्याकाळी मुख्य दाराजवळ दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळेच संध्याकाळी मेनगेटजवळ दिवा लावण्याची प्रथा चालत आली आहे.

 

6. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईच्या वातीचा उपयोग करावा. याउलट तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याच्या वातीचा उपयोग करणे जास्त शुभ राहते.

मागे

आज धनत्रयोदशी, जाणून घेऊया महत्व आणि मुहूर्त
आज धनत्रयोदशी, जाणून घेऊया महत्व आणि मुहूर्त

'प्रकाशमय' अशा सणाला म्हणजे दिवाळीचा आजचा पहिला दिवस. धनत्रयोदशी आणि वसु....

अधिक वाचा

पुढे  

8 डिसेंबरला साजरी केली जाईल मोक्षदायिनी एकादशी, या व्रतामुळे….
8 डिसेंबरला साजरी केली जाईल मोक्षदायिनी एकादशी, या व्रतामुळे….

मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला भारतीय धर्म शास्त्रामध्य....

Read more