ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

'खूनी गणपती'

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 11, 2019 05:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'खूनी गणपती'

शहर : धुळे

इतिहासातील काही चुकीच्या घटनांमुळे देवतांना देखील बदनाम केले जाते. वास्तविक अशा घटना घडून कित्येक वर्ष लोटली तरी त्यावरून तेथील धार्मिक उत्सवाला किंवा देवतेला चिकटलेले नाव कायम राहते. याचे उदाहरण धुळेयेथील 'खूनी गणपती'चे देता येईल. धुळे शहरातील हा मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला 'खूनी गणपती' का म्हणतात? हे जाणून येणे आवश्यक आहे.

1895 साली खांबोटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. एक वर्षी या गणपतीची विसर्जनाची मिरवणूक धुळे शहरातील जुन्याशाही जामा मशिदी जवळून जात होती. तेव्हा या मिरवणुकीला काही मंडळींनी विरोध केला. त्यावरून वाद वाढला आणि हाणामारी  झाली. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या तत्कालीन ब्रिटिश पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. यात अनेक जण मृत्यूमुखी पडले.

तेव्हापासून गणपतीच्या वेळी मशिदीच्या परिसरात खून होतात अशी समजूत स्थानिक लोकांमध्ये रूढ झाली. या चर्चेतूनच धुळ्यातील या गणपतीचे 'खूनी गणपती' असे नाव पडलं. त्यानंतर तत्कालीन ब्रिटिश अधिकार्‍यानी हिंदू-मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला. त्या वर्षापासून धुळ्यातील 'खूनी गणपती' हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनला आहे.

 

मागे

 गौराई आली अंगणी
गौराई आली अंगणी

श्रावण महिना संपतासंपताच वेध लागतात ते भाद्रपदात येणार्‍या गौरी गणपतीचे! ....

अधिक वाचा