ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2021 11:51 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या

शहर : मुंबई

माघ हा एक भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षातील अकरावा महिना आहे. पौष महिन्यानंतर माघ मास प्रारंभ होतो. पुराणात माघ महिन्याच्या महात्म्याचे वर्णन मिळतं. ’अमावास्यान्त पद्धतीनुसार माघ महिना माघ शुक्ल प्रतिपदेला सुरू होतो आणि माघ अमावास्येला संपतो. पौर्णिमान्त पद्धतीनुसार हा महिना १५ दिवस आधी सुरू होतो आणि १५ दिवस आधी म्हणजे पौर्णिमेला संपतो. म्हणजे जेव्हा अमावास्यान्त पद्धतीची कार्तिक वद्य प्रतिपदा असते, तेव्हा पौर्णिमान्त पद्धतीची माघ वद्य प्रतिपदा असते. दोन्ही पद्धतींतला शुक्लपक्ष एकच असतो.

पद्म पुराणानुसार माघ महिन्यात स्नान, दान आणि तप याचे महत्त्व आहे. या व्यतिरिक्त या महिन्यात ब्रह्मवैवर्तपुराण कथा ऐकण्याचे देखील महत्त्व आहे.तिलकुंद चतुर्थी, वसंत पंचमी, आणि भीमाष्टमी या महिन्यात पडणारे प्रमुख सण आहेत. या महिन्याच्या द्वादशीला यमाने तिळाची निर्मिती केली आणि राजा दशरथाने त्यांना पृथ्वीवर शेतात पेरले होते. म्हणून या महिन्यात व्रत तसेच ‍तीळ दान करणे व तिळाचे सेवन करणे याचे अधिक महत्त्व आहे.

'माघे निमग्नाः सलिले सुशीते विमुक्तपापास्त्रिदिवं प्रयान्ति।'

'प्रीतये वासुदेवस्य सर्वपापानुत्तये। माघ स्नानं प्रकुर्वीत स्वर्गलाभाय मानवः॥'

पुराणांप्रमाणे या महिन्यात शीतल पाण्यात स्नान केल्याने मनुष्य पापमुक्त होऊन स्वर्गलोकात जातो. पद्मपुराणानुसार माघ मासमध्ये पूजा केल्याने देव इतक्या लवकर प्रसन्न होत नाही जेवढे पाण्यात स्नान केल्याने होतात. म्हणून सर्व पापांपासून मुक्तीसाठी आणि वासुदेवाची प्रीति मिळविण्यासाठी प्रत्येकाने पवित्र नदीत स्नान करावे.

माघमासे गमिष्यन्ति गंगायमुनसंगमे।

ब्रह्माविष्णु महादेवरुद्रादित्यमरूद्गणा:।।

या महिन्यात प्रयाग संगम किनार्‍यावर कल्पवास करण्याचे विधान आहे. सोबतच पौर्णिमा आणि अमावास्येला गंगा स्नान केल्याने अनंत पुण्य प्राप्त होतात. याने सर्व पापांपासून मुक्ती मिळून स्वर्ग प्राप्ती होते कारण ब्रह्मा, विष्णु, महादेव, रुद्र, आदित्य आणि मरूद्गण माघ महिन्यात प्रयागराजसाठी यमुना संगम वर गमन करतात.

मागे

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर
माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

माघी गणेशोत्सवासाठी (Maghi Ganeshotsav) राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आह....

अधिक वाचा

पुढे  

शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!
शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!

धन प्राप्तिसाठी, हनुमानाच्या कृपा प्राप्तिसाठी, शनिच्या अवकृपेपासून वाचण....

Read more