ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्राद्धाचे 12 प्रकार

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 04:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्राद्धाचे 12 प्रकार

शहर : मुंबई

भाद्रपद मास कृष्ण पक्षाच्या श्राद्ध पक्ष व्यतिरिक्त चैत्र कृष्ण प्रतिपदेच्या सात दिवसांपर्यंत सात पितरांची पूजा केली पाहिजे. ज्याने घरात आणि प्रत्येक मंगल कार्यात कोणत्याही प्रकाराचे व्यवधान येत नाही.

भविष्यपुराणात मुनी विश्वामृत यांच्या संदर्भानुसार 12 प्रकाराचे श्राद्ध वर्णित आहे. विष्णू पुराण आणि गरूड पुराणात देखील श्राद्ध संबंधी संदर्भ आहे. पितरांनिमित्त दोन यज्ञ केले जातात जे पिंड पितृयज्ञ आणि श्राद्ध असे म्हटले जातात.

12 प्रकाराचे विशेष श्राद्ध

* पहिला, नित्य श्राद्ध, जे दररोज केलं जातं. नित्य अर्थातच दररोज घडणारी क्रिया.

* दुसरं नैमित्तिक श्राद्ध, जे एका पितृच्या उद्देश्याने केलं जातं त्याला नैमित्तिक श्राद्ध असे म्हणतात.

* तिसरं काम्य श्राद्ध, जे एखादी कामना अर्थात इच्छा किंवा सिद्धी प्राप्तीसाठी केलं जातं.

* चौथं पार्वण श्राद्ध, जे अमावास्येच्या विधानानुरूप केलं जातं.

* पाचव्या प्रकाराच्या श्राद्धाला वृद्धी श्राद्ध असे म्हणतात. यात वृद्धीची कामना असते जसे संतान प्राप्ती किंवा कुटुंबात विवाह.

* सहावं श्राद्ध सपिंडन, यात प्रेत पितरांच्या मिलनाची इच्छा असते. यात प्रेतांनी पितरांच्या आत्म्यासह सहयोग करावा अशी भावना असते.

* सात ते बाराव्या प्रकाराच्या श्राद्धाची प्रक्रिया सामान्य श्राद्ध सारखी असते. यासाठी यांचं वेगळ्याने नामकरण गोष्टी, प्रेत श्राद्ध, कर्मांग, दैविक, यात्रार्थ आणि पुष्टयर्थ केलं जातं.

मागे

श्राद्ध पक्ष, जाणून घ्या कोणत्या तिथीला काय केल्याने पूर्वज होतील प्रसन्न
श्राद्ध पक्ष, जाणून घ्या कोणत्या तिथीला काय केल्याने पूर्वज होतील प्रसन्न

भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते अमावस्या पर्यंत श्राद्ध पक्ष असून धर्म शास्....

अधिक वाचा

पुढे  

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुन्हा नवीन वाद
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुन्हा नवीन वाद

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे काही नवीन नाही गतवर्षी यवतमाळ य....

Read more