ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2021 10:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

शहर : मुंबई

माघी गणेशोत्सवासाठी (Maghi Ganeshotsav) राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणंच माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करा, असा निर्देश राज्य सरकारने मंडळांना दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी गणेशोत्सवासाठी नियमावली राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

गणेशमूर्ती, मंडपाच्या आकारावर निर्बंध ठेवण्यात आले आहे. मंडपात एका वेळी 10हून अधिक कार्यकर्ते नसावेत, असं देखील राज्य सरकारने सांगितले आहे. तसेच माघी गणेशोत्सवात मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

१५ फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सुरु होतोय. त्यासाठी राज्य सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मंडप उभारणीसाठी पालिकेची किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मडपात एका वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे. भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात गणेश मूर्ती आणि मंडपांच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राज्यसरकारकडून मंडळांसाठी कोणते नियम?

* मंडप उभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

 

* मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही, सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

* मंडपात एका वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे.

* सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रम, रक्तदान किंवा आरोग्य शिबीर अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे.

 

* ऑनलाइन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून दर्शनाची सोय करावी, मंडपात सामाजिक अंतराचे पालन करावे, वेळोवेळी मंडपाचे र्निजतुकीकरण करावे, येणाऱ्या भाविकांची तापमान तपासणी, मुखपट्टीचा वापर, स्वच्छतेचे नियम आदींबाबत दक्षता बाळगावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

*’ विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल. शिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच गणेश विसर्जन करावे असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

 

मागे

श्री लक्ष्मी देवीची कहाणी : मार्गशीर्ष महिन्याच्या गुरूवारी आवर्जून वाचावी ही कथा
श्री लक्ष्मी देवीची कहाणी : मार्गशीर्ष महिन्याच्या गुरूवारी आवर्जून वाचावी ही कथा

मार्गशीर्षच्या दिवसांमध्ये एक व्रतकथा आवर्जून वाचली जाते. या व्रत कथेमागे ....

अधिक वाचा

पुढे  

Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या
Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या

माघ हा एक भारतीय राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षातील अकरावा महिना आहे. पौष महि....

Read more