ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देवभाषा संस्कृत मध्ये खांडेकरांची 'ययाती'

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 28, 2019 10:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देवभाषा संस्कृत मध्ये खांडेकरांची 'ययाती'

शहर : पुणे

मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळविलेल्या वि.स.खांडेकर यांच्या 'ययाती' या कादंबरीचे  देवभाषा संस्कृत मध्ये अनुवाद करण्यात आला आहे. हैदराबाद येथील रामकृष्ण सूरी यांनी हा संस्कृत अनुवाद केला आहे.

प्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर यांची 'ययाती' ही कादंबरी प्रचंड गाजली . आजही मराठी भाषिकप्रेमी या कादंबरीची पारायने करतात. अशा या कादंबरीच्या संस्कृतमध्ये अनुवादीत झालेल्या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवार दि.1 सप्टेंबर रोजी पुन: प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते होणार आहे. या अनुवादीत कादंबरीचे नावही तेच म्हणजे 'संस्कृत ययाती' असे आहे. कादंबरी प्रकाशनाचा कार्यक्रम संस्कृत भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि पुणे मराठी ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात नारायण पेठ येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्कृत भारतीचे अखिल भारतीय प्रक्षिक्षण प्रमुख डॉ. विश्वास भूषविणार आहेत.

 

मागे

कृष्ण जन्माष्टमी व्रताचे महत्त्व
कृष्ण जन्माष्टमी व्रताचे महत्त्व

1. अष्टमीचे दोन प्रकार आहेत- पहिला जन्माष्टमी आणि दुसरा जयंती. यात केवळ पहिली ....

अधिक वाचा

पुढे  

प्रत्येक युगात गणपतीचे बदलते स्वरूप
प्रत्येक युगात गणपतीचे बदलते स्वरूप

विघ्नेश विघ्नचखण्डननामधेय श्रीशंकरात्मज सुराधिपवन्द्यपाद। दुर्गामहाव....

Read more