ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राजकीय घडामोडींचे वर्ष - २०१९

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 30, 2019 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राजकीय घडामोडींचे वर्ष - २०१९

शहर : मुंबई

          २०१९ हे वर्ष अनेक घटनाक्रमांनी कायमच लक्षात राहील. याच वर्षांत जशा राजकीय घडामोडी घडल्या त्याहीपेक्षा नैसर्गिक प्रकोपामुळे हे वर्ष लक्षात राहणारे आहे. देशपातळीवर यावर्षी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे भाजपप्रणीत रालोआने लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवून दुस-यांदा केंद्रात सत्ता स्थापन केली. देशाच्या ७० वर्षाच्या इतिहासात कॉंंग्रेसेतर दुस-या पक्षाने सलग दुस-यांदा सत्तास्थानी येण्याची ही पहिलीच घटना घडली. त्याचबरोबर नरेंद्र मोदी दुस-यांदा पंतप्रधान झाले हा देखील एक इतिहास त्यांनी रचला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी तीन वेळा पंतप्रधान झाले होते, पण त्यातील पहिल्या वेळी फक्त १३ दिवस, दुस-या वेळेसही ते अल्पकाळ पंतप्रधान झाले होते. मात्र तिस-या वेळी त्यांनी पूर्ण काळ पंतप्रधानपद भूषविले होते. परंतु, कॉंंग्रेस सोडल्यास अन्य पक्षाने दुस-यांदा सत्ता मिळविल्याची आणि त्या पक्षाचा नेता सलग दुस-यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्याची ही पहिलीच घटना देशाच्या इतिहासात नमूद झाली आहे. 


          दुस-यांदा पंतप्रधान होताच मोदी सरकारने सर्वांत प्रथम जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केले. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि लडाख अशी दोन राज्ये निर्माण केली. तत्पूर्वी २०१९ च्या प्रारंभी जम्मू काश्मीरातील पुलवामात दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर १५ दिवसांच्या आत भारतीय वायू सेनेने पाकव्याप्त काश्मीरात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. अनेक दहशतवाद्यांना ठार मारले. १९७१ नंतर अशी कारवाई प्रथमच करण्यात आली. त्याचबरोबर तीन तलाक विधेयक, मोटार वाहन संशोधन कायदा, एक देश एक ड्रायव्हिंग लायसन्स, टोलप्लाझा वर फास्टटॅग, एक देश एक रेशन कार्ड, एनईएफटी २४ तास खुली, आसामात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती, असे एका मागोमाग एक धाडसी निर्णय मोदी सरकारने याच वर्षात घेतले. मात्र यातील नागरिकत्व कायदा दुरुस्तीला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. 


           दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचे भाजपचे स्वप्न भंगले. तर ठाकरे कुटुंबातील आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीत लढवून जिंकले आणि आमदार झाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही झाले. आता आदित्य ठाकरेंची मंत्रिमंडळातही वर्णी लागली आहे. शिवसेनेच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ठाकरे कुटुंबातील कुणीही निवडणूक लढवली नव्हती किंवा मंत्रिपद स्वीकारले नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत मातोश्रीवरून रिमोट कंट्रोल चालवून देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. पण स्वतः कोणतेही सत्तापद घेतले नाही. परंतु उद्धव ठाकरे आणि त्यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांनी ही परंपरा मोडली. ते सत्तास्थानी विराजमान झाले. हाही एक नवा इतिहास त्यांनी निर्माण केला आहे. 


          दुसरीकडे भाजपाचा २०१८ पर्यंत देशाच्या ७१ टक्के भूभागावर ताबा होता. पण २०१९ मध्ये उतरती कळा लागली आणि अवघ्या ३३ टक्के भूभागावर भाजपची सत्ता शिल्लक राहिली आहे. काहीही करून सत्ता मिळवायचीच अशा इराद्याने भाजपने काही राज्यांमध्ये बहुमत नसताना सत्ता हस्तगत केली. मात्र महाराष्ट्रात भाजपला ती किमया साध्य करता आली नाही. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये भाजपला नामुष्कीच्या पराभवाला सामोरे जावे लागले. नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधीही भाजपला अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. 


        दरम्यान गोव्यातील सत्ता निष्काळजीपणामुळे गमावलेल्या कॉंंग्रेसने महाराष्ट्रात मात्र शहाणपणा दाखविला. गेली ५-६ वर्षे दयनीय अवस्था झालेल्या कॉंंग्रेसला महाराष्टात सत्तेत सहभागी होताच ‘बळ’ आले. झारखंडमधील निकालाने तर कॉंंग्रेसचा आत्मविश्वास वाढल्याचेच दिसून येत आहे. २०१९ हे त्या दृष्टीने कॉंंग्रेसला उभारी देणारे वर्ष ठरले आहे. 

 

           त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तर वयाच्या ८० व्या वर्षातही राजकीय चमत्कार घडवून आणला. भाजपच्या तोंडातून सत्तेचा घास त्यांनी अक्षरश: हिरावून घेतला, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. सत्तेपासून वंचित असलेल्या कॉंंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजपात सामिल झाले. लोकसभा निवडणुकीतही मुख्यत्वे मोदी लाटेत दोन्ही कॉंंग्रेसची वाताहात झाल्याचे पाहावयास मिळाले. या पार्श्वभूमीवर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष नामशेष होणार की काय, अशी स्थिति निर्माण झाली होती. कारण दोन्ही कॉंंग्रेसमधील बडे नेते भाजपने गळाला लावले होते. अशा स्थितीत शरद पवार यांनी झंझावती प्रचार केला. परिणामी त्यांच्या पक्षाला तिस-या क्रमांकाच्या जागा मिळाल्या. मग त्यांनीच पुढाकार घेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना कॉंग्रेससह महाआघाडी निर्माण केली. शिवाय उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची सत्ताही स्थापन केली. याचे शिल्पकार शरद पवारच आहेत. 


           अशाप्रकारे सरते वर्ष २०१९ हे अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते, म्हणूनच ते काम कायम लक्षात राहिल!  
 

मागे

वडाच्या पारावार - नववर्ष स्वागताची तयारी
वडाच्या पारावार - नववर्ष स्वागताची तयारी

  मन्या : संत्या-गण्या, काल पारावर का नाही आलात? संत्या : नव्या वर्षाची स्वाग....

अधिक वाचा

पुढे  

वडाच्या पारावार - कमळ कोमेजताच हात सरसावला
वडाच्या पारावार - कमळ कोमेजताच हात सरसावला

संत्या : हाताला १३४ वरसं झाली बगा. गण्या : हाताला नाय रं कॉंग्रेसला म्हन. सं....

Read more