ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आता वेध विधानसभा निवडणुकीचे

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आता वेध विधानसभा निवडणुकीचे

शहर : मुंबई

हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत श्री गणरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि निर्विघ्नपणे  पार पडला. आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले दिसत आहेत. वास्तविक लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 6 महिन्यात होईल, हे निश्चित झाले आहे. म्हणजेच ऑक्टोबर  2019 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा होती.

निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली की, काही राजकीय निर्णय घेता येणार नाहीत, याची जाणीव असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या महिन्याभरात जवळपास 50 हून अधिक निर्णय घेतले. हे निर्णय घेताना राज्यातील सर्व घटकांना खुश करण्याची काळजी आधीच दिसून येईल. अनेक योजनाही जाहीर केल्या गेल्या आहेत. अर्थात आधीच 4 लाख कोटीहून अधिक कर्जाचा बोजा असलेले राज्य सरकार या योजनांसाठी किंवा दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी निधी कसा उपलब्ध करणार, हे सांगितलेले नाही. फक्त घोषणा केलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यावर पुन्हा सतत आल्यानंतर या आश्वासनाची पूर्तता करण्याची वेळ येणार आहे तेव्हाचे तेव्हा पाहू असा विचार फडणवीस सरकारने केला असावा. दुसरीकडे राज्यात पूर्ण सतेवर येण्याच्या दृष्टीने भाजपनेत्यांनी जबरदस्त रणनीती आखली आहे. त्यानुसार विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांसह सर्वांनाच आपले दरवाजे उघडे ठेवले आहेत. त्याचबरोबर शिवसेनेशीही युती आहेच. ही युती कायम ठेवण्याकडे भाजप नेत्यांचा कल आहे. त्यामुळे युतीतील जागा वाटपाचा तिढाही अधिक घासाघिस न करता सोडविला जाईल, अशी अपेक्षा आहे.

तसे पाहिले तर सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास कधीचीच सुरवात केली आहे. मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा, शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रीवादीचे अमोल कोल्हेची शिवस्वराज्य यात्रा अशा यात्रांनी महाराष्ट्र ढवळून काढलाच आहे. तर काही पक्ष अद्द्याप संभ्रमात असल्याचे दिसत आहे. भाजप शिवसेनेत 'वजनदार' नेते गेल्यामुळे दोन्ही कॉंग्रेस पक्ष राज्यात खिळखिळे झालेले दिसत आहेत. शिवाय कॉंग्रेससारख्या जुन्या पक्षात गटबाजी उफाळून येत असते. अशा स्थितीत विधानसभा निवडणूक एकतर्फी होणार की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुन्हा स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरल्याचे संकेत आहेत. कारण विरोधी पक्षातील मातब्बर नेत्यांना भाजप शिवसेनेने आश्रय दिला असून येत्या विधानसभा निवडणुकीत यातील अनेक जण रिंगणात उतरवले जाण्याचीही शक्यता आहे. म्हणजेच काल परवापर्यंत आपल्या पक्षात असलेल्या नेत्याच्या विरोधात दोन्ही कोंग्रेसच्या उमेदवारना सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे मुळातच या नेत्यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघ त्यांना मिळेलच शिवाय सत्ताधारी पक्षात असल्याने वेगळी कुमक मिळेल. साहजिकच त्यांचे 'बळ'वाढेल. तर भाजप शिवसेनेतील असंतुष्टाचीही अन्यत्र वर्णी लावण्यात येईल. त्याचबरोबर ज्यांना उमेदवारी देता येणार नाही. त्यांचीहि समजूत घालता येईल. हे झाले प्रमुख पक्षांचे पण अन्य राजकीय पक्षही आहेत. ते आपआपल्या पक्षाच्या ताकदीनुसार उमेदवार उभे करतील. अशा स्थितीत मनसेची भूमिका अद्द्याप स्पष्ट झालेली नाही. मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकला नाही.तेव्हा आता राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणुकीची घोषणा सोमवार पर्यंत होईल, असे म्हटले जात आहे. गणपती विसर्जनांनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी निवडणूक होईल असा अंदाज होत आहे. त्यामुळे आता निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसत आहे.

 

मागे

खटार्‍याचा प्रवास
खटार्‍याचा प्रवास

मन्या : संत्या तुझ वय काय ? संत्या : सत्तर आणि दोन. मन्या : म्ह्जे ७२ . गण्या  ....

अधिक वाचा

पुढे  

आणखी कुणी र्हयालय का?
आणखी कुणी र्हयालय का?

संत्या : आमच बी ठरलय बग ? मन्या : काय ठरलंय तुमचं ? गण्या : आमि बी तुझ्या पक्षा....

Read more