ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

हातात हात पकडला पाहिजे

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 01:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

हातात हात पकडला पाहिजे

शहर : मुंबई

नातं कोणतंही असो

मतभेद कितीही असो

संबध तोडण्याची भाषा 

मुळीच कधी करू नये

 

प्रत्येक माणूस वेगळा

विचारसरणी वेगळी

मनुष्य जन्मा तुझी

कहाणीच आगळी-वेगळी

 

बापा सारखा मुलगा नसतो

मुला सारखी सून नसते

नवरा आणि बायकोचे तरी

कुठे तेवढे पटत असते ?

 

जरी नाही पटले तरी

गाडी मात्र हाकायची असते

अबोला धरून विभक्त होऊन

सार गणितं चुकायचे नसते

 

काही धरायचं असतं

काही सोडायचं असतं

एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून

एकमेकाला सोडायचं नसतं

 

चुकल्यावर बोलावं

बोलल्यावर ऐकूण घ्यावं

एकांतात बसल्यावर

अंतरंगात डोकवावं

 

राग मनात ठेवला म्हणून

कोणाचं भलं झालं का ?

बिन फुलाच्या झाडा जवळ

पाखरूं कधी आलं का ?

 

समोरची व्यक्ती चुकली तरी

प्रेम करता आलं पाहिजे

झालं गेलं विसरून जाऊन

गच्च मिठी मारली पाहिजे

 

स्वागत होईल होईल

जाणं येणं चालू ठेवल पाहिजे

समोरचा जरी चुकला तरी

म्हणा "खुशाल ठेव देवा त्याला !"

 

आयुष्य खूप छोटं आहे

हां हां म्हणता संपुन जाईल

प्रेम करायचं राहिलं म्हणून

शेवटी खूप पश्चात्ताप होईल

 

लक्षात ठेवा नात्या पेक्षा

दुसरं काहीही मोठं नाही

आपलं माणूस आपल्या  जवळ 

या सारखी श्रीमंती नाही !

मागे

बापाला बघितलं आहे का?
बापाला बघितलं आहे का?

मोठा झाल्यापासुन बापाला, कधी मिठी मारून बघितलं आहे का ? मारून बघा, ह्रुदय ....

अधिक वाचा

पुढे  

वाईट काळात कलाम सरांच्या या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा !
वाईट काळात कलाम सरांच्या या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा !

मित्रांनो ही गोष्ट आहे 2002 ची, वर्तमानपत्रापासून ते "टी व्ही" पर्यंत फक्त ए....

Read more