ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

स्वातंत्र्यदिन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

स्वातंत्र्यदिन

शहर : मुंबई

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्रतिवर्ष, १५ ऑगस्ट हा दिवस भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे राष्ट्रीय पर्व संपूर्ण देशभरात अमाप उत्साहात साजरा केले जाते.

 

कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.

 

१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.

 

१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

मागे

वडाच्या पारावार
वडाच्या पारावार

गण्या : संत्या आज पारावार यायला एवढा उशीर का ? मन्या : असा सुतकी चेहरा का तुझा....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली
राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य म....

Read more