ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जबरदस्तीच्या आघाडीच फलीत

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 11, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 जबरदस्तीच्या आघाडीच फलीत

शहर : मुंबई

असंगाशी संग केल्यावर किवा विळ्या-भोपळ्याची मोट बांधल्यावर जे होतं तेच चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकरणात पाहायला मिळत आहे. असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. आज चक्रव्यूहात सापडल्यासारखी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाली असल्यास आश्चर्य वाटणार नाही. २९ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर अन्य सत्र आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेलाही आता १५ दिवस होतील. पण अद्याप या सरकारचे खातेवाटपच झालेले नाही. सहा मंत्री आहेत पण ते बिंखात्याचे मंत्री आहेत. शिवसेनेने वेगळी विचारधारा असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी आघाडी करून सरकार स्थापन केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. खातेवाटपाचा फॉर्म्युलाही ठरला. त्यानुसार शिवसेनेला १५ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १५ आणि कॉंग्रेसला विधानसभा अध्यक्षपदासह ९ केबिनेट आणि तीन राज्यमंत्री पदे देण्याचे ठरले. मात्र सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या खात्यावरून तिन्ही पक्षांमध्ये घासाघासी सुरू आहे. या तीन खात्यांचे योग्य वाटप होत नसल्याने कॉंग्रेस नेते नाराज असल्याचे कळते. त्यामुळे कॉंग्रेसने ठाकरे सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा दिल्याचे कळते.

मुळात वेगळ्या विचारधारा असलेले तीन पक्ष एकत्र आले आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, असे जरी या पक्षाचे नेते सागत असले तरी सत्तेसाठी त्यांनी आघाडी केली हे उघड सत्य आहे. मुख्य म्हणजे काहीही करून शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा, हा उद्धव ठाकरे यांचा अट्टहास त्यासाठी शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेसशी अनेक मुद्यावर तडजोडी केल्या. स्वताच्या भूमिकेला मुरड घातली. केंद्रातील मंत्रीपदावर पाणी सोडलं. युती तोडली एवढी किमत मोजल्यावर मुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं. आता खातेवाटप घासाघासी करून उद्धव ठाकरेच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. कॉंग्रेस तर टोकाची भूमिका घेण्यास मागे पुढे पाहणार नाही, असाच आज वरचा अनुभव आहे, ही सुरुवात आहे. प्रत्यक्षात सरकार चालवताना अजून किती अडथळे आणले जातील ते सांगता येणार नाही. ते अडथळे ही पार करावे लागतील यातून शिवसेनेने काय कमावले आणि काय गमावले, याचे उत्तर पुढच्या काळात मिळेलच. तूर्तास दोन्ही कॉंग्रेसचे नेते आपल्या मर्जीप्रमाणे शिवसेनेला वाकविताना दिसत आहेत.

 एकंदरीत संपूर्ण चित्र पहिले तर एक गोष्ट चटकनं लक्षात येईल की, गेल्या काही वर्षात दोन्ही कॉंग्रेसची राजकरणात अशाच वेळकाढू धोरणामुळे पीछेहाट झाली. पण यातून त्यांनी काहीच धडा घेतला नसल्याचे जाणवते. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या हट्टाहासने शिवसेनेला नं पटणार्‍या तडजोडी स्वीकाराव्या लागताना दिसत आहे. आधी दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी आघाडीसाठी शिवसेनेला काही अटी घातल्या. त्याची पूर्तता केल्यानंतर किमान समान कार्यक्रमाचं गुर्‍हाळ लावल. त्यालाही शिवसेनेने मान्यता दिल्यावर सत्ता स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची अट घातली. ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मान्य केली. आता खातेवाटपात महत्वाची खाती स्वत:कडे घेण्याचा दोन्ही कॉंग्रेसचा निर्धार आहे. त्याप्रमाणे ते आपल्या हेतु साध्य करतील, यात काही शंका नाही. कारण सत्तेची गरज जशी काय शिवसेनेलाच आहे आणि शिवसेनेनवर आपण उपकार करीत आहोत, असाच आविर्भाव या दोन्ही कॉंग्रेस नेत्यांचा दिसतो. दुसरीकडे या दोन्ही कॉँग्रेसच्या मर्जीनुसार चालणे, एवढेच आता उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याची चर्चा आहे. जबरदस्तीच्या आघाडीचे हे फलित आहे, असे म्हंटले तर चूक ठरू नये.      

मागे

भेट एका वाढदिवसाची
भेट एका वाढदिवसाची

मी सुचेता. आज माझा वाढदिवस. सचिन सकाळीच म्हणाला, “आज काही करू नकोस, मी लंचला ....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय राजकारणातील भीष्माचार्य-शरद पवार
भारतीय राजकारणातील भीष्माचार्य-शरद पवार

           भारतीय राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ज्यांचा उल्लेख केले....

Read more