ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मॅजिकल व्हॅलेंटाईन

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: फेब्रुवारी 13, 2021 04:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मॅजिकल व्हॅलेंटाईन

शहर : मुंबई

सध्या आजूबाजूला सर्व मॅजिकल आहे असे दिसत आहे. त्याच कारण ही खास आहे. फेब्रुवारी महिना सुरू आहे. फेब्रुवारी आणि प्रेम यांचं एक नातं आहे. या महिन्यात व्हॅलेंटाईन डे, प्रेमाचा दिवस असतो. हां यावेळी व्हॅलेंटाईन डे आतपर्यंत जसे होता त्याहून भिन्न असेल. सर्व जगासमोर कोरोनाचं संकट होत अजूनही हे संकट पूर्ण संपलेलं नाही. या संकटातून हळू हळू सर्व जण सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, सर्व हळू हळू ठीक होत आहे आणि त्यात हा व्हॅलेंटाईन डे लोकांच्या जीवनात प्रेमाचा सुगंध पसरायला आला आहे. आता प्रेम म्हंटल तर आपोआप चेहऱ्यावर एक स्मितहास्य येत. एकमेकांवर प्रेम करणारे लोक व्हॅलेंटाईन डे ला एखादी भेटवस्तू देणे किंवा ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याला आवडेल ते किंवा त्याच्या आठवणीत राहिल असं काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न करतात. आपले प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी आहे. म्हणूनच प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीला एका विशिष्ट व्याख्येत मांडणे चुकीचे ठरेल.

 

आजच्या या धावत्या जगात जर पाहिले तर परिस्थिती वेगळी दिसते. आजच्या स्थितीला दोन बाबी आहेत. त्यापैकी पहिली ज्याला खरोखरच प्रेमाची जाणीव आहे आणि दुसरी ज्याला प्रेम फक्त गरज वाटते. खर तर व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रेम दर्शविण्याचा दिवस नाही. प्रेम प्रत्येक क्षणी, दर दिवस, दर महिन्याला, दर वर्षी थोडक्यात काय तर कायमस्वरूपी राहणार आहे ते वाढतचं जात. प्रेमात कोणतीही जबरदस्ती नसते ना कोणत्या अपेक्षा असतात. प्रेम नि:स्वार्थ असते. आतापर्यंत प्रेमावर बर्याच कविता, चित्रपट, कथा लिहिल्या गेल्या आहेत. प्रेम तस तर समजायला सोपं ही आहे आणि कठीण ही. प्रेम शब्दांत सांगता येत नाही. हे आपल्या सर्वांना मिळालेले एक अमूल्य, सुंदर अस गिफ्ट आहे, जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आज कलचं प्रेम 4 जी, 5 जीच्या वेगासारखे झाले आहे आणि वेगवेगळ्या कारणांमुळे प्रेमाचं हे फुल उमलण्या आधीच कोमेजून जात. प्रेम म्हणजे दोन लोकांचा एकमेकांवर असलेला भक्कम विश्वास, आदर, कायमस्वरूपी साथ, बोलताच सर्व काही बोलून जाणं आणि समोरच्याला ही ते समजणं. प्रेम हे अशाप्रकारे उमलत जात आणि मग त्या प्रेमाचा सुगंध दरवळतोत्यामुळे गरजेचं नाहीय की प्रियकर -प्रेयसी, पती - पत्नी सोबतच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जायला हवा. ज्यांनी आपल्यावर आयुष्यात खूप प्रेम केल, सुख - दुखामध्ये सोबत राहिले ते मित्र, पालक, भावंडे, गुरु हे आपले व्हॅलेंटाईन असू शकतात. आणि या सर्वांमध्ये आणखी एक आहे जो या प्रेमाचा हकदार आहे. तो हकदार म्हणजे आपण स्वतः.

 

आपण सर्वांवर प्रेम करतो पण जेवढे प्रेम आपण इतरांवर करतो तितके प्रेम आपण स्वतःवर कधीच करत नाही. जसे की जेव्हा काही विपरीत घडते तेव्हा आपण स्वतःला खूप खूप दोष देतो आणि बरेच काही बोलतो. परंतु अनेकदा कदाचित त्याची इतकी गरज ही नसते. यामुळे या व्हॅलेंटाईन ला आपण एक चांगली सुरुवात करू शकतो, ती म्हणजे  स्वत: वर प्रेम करणे, स्वत: ला समजणे. कोणी आपल्याला काहीही बोलले, त्रास दिला तरी आपण स्वतःवर प्रेम करायचे, स्वतःला समजून घ्यायचे. याचा अर्थ असा आहे की जर आपण काही चुकीचे केले नसेल तर स्वत: वर खूप कठोर होता, आपल्याला सोडून जाणाऱ्या लोकांचा विचार करता स्वतःला योग्य मार्गदर्शन करणे आणि जे सत्य आहे त्याबरोबर राहणे. तसेच, जर आपण एखाद्याची स्वप्ने पूर्ण करू शकलो तर ती पूर्ण करण्यात योगदान देणे.

 

कोणत्याही गोष्टीची सुरुवात आधी स्वतः पासून होते. जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करू शकत नाही तोपर्यंत इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करणे अयोग्य ठरेल. तसेच, जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करू शकत नाही तोपर्यंत आपण दुसर्यावर प्रेम कस काय करणार?. म्हणून खरोखरचं जर आपण स्वतः वर प्रेम करू शकलो, स्वतःचे मार्गदर्शक, मित्र .होऊ शकलो तर ते मॅजिकल व्हॅलेंटाईन असेल आणि यासाठी या व्हॅलेंटाईन डे, मॅजिकल डे ला खूप खूप धन्यवाद.

लेखन 
दिनेश शिंदे 

मागे

People's President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने 'फकीर'
People's President डॉ.अब्दुल कलाम: पोखरणचा हिरो आणि खऱ्या अर्थाने 'फकीर'

'पीपल्स प्रेसिडेंट' म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची आ....

अधिक वाचा