ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

वडाच्या पारावार - नववर्ष स्वागताची तयारी

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 04:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावार - नववर्ष स्वागताची तयारी

शहर : मुंबई

 
मन्या : संत्या-गण्या, काल पारावर का नाही आलात?
संत्या : नव्या वर्षाची स्वागताची तयारी करीत व्हतो आमी. 
गण्या : काय हाय कधी नियम कायदे बदलतील सांगता येत न्हाय 
मन्या : नव्या वर्षाची स्वागताचा आण कायद्याचा काय संबध? कुनीबी स्वागत करावं. 
संत्या : आरं नववर्ष स्वागतचं निमित्त आसतं. 
गण्या : त्या निमित्तानं जरा जास्त घेता येते. 
मन्या : दारू पिण्यासाठी निमित्त लागतं, हे आजच एकतोय. 
संत्या : आमी दुसरं काय करणार?    
गण्या : मुंबै-पुन्यासह देशातले शीरीमंत ३१ डिसेंबरला मोठ्या हाटेलात, चौपाट्यांवर किवा गडांवर धिंगाणा घालतातच ना?
संत्या : तसा तर आमी काय करीत न्हाय नव्ह? 
मन्या : प्रत्येकाची समज येगळी आसते खरं तर आपलं नवं वर्ष पाडव्याला सुरू व्हतं. 
गण्या : आपल्याकडं गुढ्या-तोरण उभारून नव्या वर्षाचं स्वागत करतात. 
मन्या : व्हयं न्हवं मग आता ३१ डिसेंबरला पुन्हा नव्या वर्षाचं स्वागत आपण का करायचं? 
गण्या : मन्या, विंग्रजी महिन्यापरमान सर्वांचे यवार चालतात. 
संत्या : आनि खरं म्हंजे सर्वच ३१ डिसेंबरला घेतात. 
मन्या : दारू पिण म्हंजे नव्या वर्षाचे स्वागत का? 
संत्या : मग आनि काय?     
गण्या : आता बरेच जन सहलीला जातात. 
मन्या : पनं यंदा सुट्टी नाय. मंगलवारी ३१ डिसेंबर हाय. 
संत्या : पाटर्या कारायला जाणारे शनिवारीच जातील. 
गण्या : चार दिवस रजा घेतील.
 मन्या : शनिवार-रविवार सुट्टी असणारे पुढे सोमवार-मंगलवार हे दोन दिवस रजा घेतील. 
संत्या : अनेक जन पाटर्या करतील, मग अमीबी थोडी अधिक घेतली तर बिघडलं कुठे? 
मन्या : जे अशा पाटर्या कारायला जातील त्यांना धांगडधिंगा घालता येणार नाय?
गण्या : का? काय बंदी हाय का काय? 
संत्या : सांगता येत नाय. अचानक कशावर पन बंदी घालतात. 
मन्या : पार्ट्यांना बंदी नाय आलेय फक्त धिंगाणा घालण्यास बंदी घातली जाईल. पोलिसांची नजर त्यांच्यावर राहणार हाय. 
गण्या : आमचं समाधान थोडक्यात आसतं. पन पाटर्या करणार्यां नी धरबंदच सोडल्याचं दिसून आलं व्हतं. 
मन्या : म्हणूनच पोलीसबी सावध झालेत. पोलीस सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात ठेवणार हायतं. 
संत्या : त्यानं काय व्हनार?
मन्या : पाटर्याच्या नावावर जे अनुचीत प्रकार घडतात त्याना आळा घातला जाईल.
संत्या : मन्या, तू काय करणार? 
मन्या : मी आपल्या परंपरेप्रमाणे गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरं करतो. 
गण्या : तू काय साजरं करणार? तू काय घेत नायस. 
संत्या : सकाळी गुढी बांधायची, गोडधोड खायचं, कुठं तरी कार्यक्रमाला जायचं, असंच ना. 
मन्या : तसंच काही नाही. आपल्या थोर परंपरेचा आपल्याला अभिमान असायला हवा. नव्या वर्षाचे नवे संकल्प कारायला हवेत, तसे आपल्यात बदल घडवायला हवेत. 
गण्या : हे तुझं म्हणनं पटलं बग. 
संत्या : पण थोडी घेतल्या शिवाय नव्या वर्षाचं स्वागत केल्यासारखं आमाला वाटतं नाय. 
मन्या : ती तुम्ही रोज घेताच की. त्यासाठी नव्या वर्षाचं स्वागतचं निमित्त हवं कशाला?   

मागे

अपघातांची मुंबई
अपघातांची मुंबई

       गेल्या १० महिन्यात राज्यात ३० हजार अपघात झाले. यात ११ हजार लोकांच....

अधिक वाचा

पुढे  

राजकीय घडामोडींचे वर्ष - २०१९
राजकीय घडामोडींचे वर्ष - २०१९

          २०१९ हे वर्ष अनेक घटनाक्रमांनी कायमच लक्षात राहील. याच वर्षां....

Read more