ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाराजांना थोपविण्याचे आव्हान

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 13, 2019 12:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाराजांना थोपविण्याचे आव्हान

शहर : मुंबई

            सत्तेत असताना नाराजांकडे दुर्लक्ष केले तर चालते पण सत्ता गेल्यावर नाराजांच्या धुसफुसीची दखल ही  घ्यावीच लागते. अन्यथा हीच धुसफूस उग्र रूप धारण करते आणि पडझडीला कारणीभूत ठरते. अर्थात सर्वच राजकीय पक्षांना याचा अनुभव आला असेल. अशाप्रकारच्या  संभाव्य पडझडीला रोखण्याचे प्रयत्न सध्या महाराष्ट्रात भाजप करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांची नाराजी उघड झाली. भाजपला महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचविणारे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी १२ डिसेंबरला गोपीनाथ गडावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी या तिन्ही नेत्यांची नाराजी प्रकर्षाने दिसून आली. महत्वाची गोष्ट म्हणजे या नारजांची समजूत घालण्यासाठी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बंद दाराआड चर्चाही केली. पण या नाराज नेत्यांचे समाधान झाले, असे दिसले नाही. कारण चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोरच एकनाथ खडसे यांनी येथील मेळाव्यात चौफेर टोलेबाजी करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

            या मेळाव्यात पंकजा मुंडे भाजपला धक्का देणारा निर्णय घेतील असे वाटत होते. १२ डिसेंबरला आपण आपला निर्णय जाहीर करू, असे पंकजा मुंडे यांनी म्हंटले होते. तर दुसरीकडे गेली ५ वर्षे सतत डावलले गेल्याने नाराज झालेले एकनाथ खडसे दिल्लीत पक्षश्रेठींना भेटण्यासाठी गेले, पण त्यांची पक्षश्रेठींना भेट झाली नाही. मग त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. तेथून मुंबईत आल्यावर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावरून खडसे किती अस्वस्थ आहेत, हेच दिसून येते. त्यांनी आपली सर्व खदखद गोपीनाथ मुंडे गडावरील मेळाव्यात बोलून दाखविली. त्याचप्रमाणे पंकजाताई पक्ष सोडणार नाहीत, पण माझा भरवसा धरू नका, असा इशारा खडसेंनी दिला. भाजपप्रणीत महायुतीतील घटक पक्षांचे नेतेही नाराज असल्याचे यावेळी दिसून आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी यावेळी आपली नाराजी व्यक्त केली असली तरी भाजप सोबतच राहणार असल्याचे जाहीर केले.

        यातील महत्वाची गोष्ट अशी की, मागील पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांचा निर्णय पक्षातील सर्वांना मान्य करणे बंधनकारक होते. शिवाय पक्षश्रेठींना त्यांच्यावर विश्र्वास असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणी सहसा बोलत नव्हते. मात्र धुसफूस तेव्हाही सुरूच होती. आता भाजप विधानसभेत विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. असे असले तरी विरोधी पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीसच असल्याने असंतुष्टाची अस्वस्थता अधिकच वाढली आहे. त्यामध्ये नाराज गटाला स्थान नसणार हे उघड आहे. साहजिकच नराजांनी सुरूवातीला दबक्या आवाजात सूचक विधाने करून पाहिले. पण त्याचा परिणाम होत नाही, असे लक्षात येताच आपली दखल घेतली जावी, असे त्यांनी प्रयत्न करून पाहिले. तरीही पक्षश्रेठींना  दुर्लक्षच केल्याचे दिसताच गोपीनाथ गडावर त्यांनी नारजींचा सूर लावला. त्यामुळेच चंद्रकांतदादांची शिष्टाई अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाली, असे म्हणता येणार नाही.  आता या नाराजांना  भाजप थोपविणार की  त्यांच्यावर कारवाई करणार हे पहावे लागेल.

मागे

भारतीय राजकारणातील भीष्माचार्य-शरद पवार
भारतीय राजकारणातील भीष्माचार्य-शरद पवार

           भारतीय राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ज्यांचा उल्लेख केले....

अधिक वाचा

पुढे  

जनसामान्यांना आपलंसं करणारा नेता
जनसामान्यांना आपलंसं करणारा नेता

भारतीय जनता पार्टीच्या बांधणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा गोपीनाथराव मु....

Read more