ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

वडाच्या पारावर - 10 रुपयांत थाली कवा आन कुठं मिलनार ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 22, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावर - 10 रुपयांत थाली कवा आन कुठं मिलनार ?

शहर : मुंबई

संत्या -: काय रं मन्या, ती 10 रुपयात थाली मिलनार ती कवा मिलनार ?

गण्या -: आन ती कुठं मिलनार ?

संत्या -: काय म्हंजे सरकारनं तसं ठरवलं का नाय ?

गण्या -: म्हंजे आसं बग, १५ वर्षापूर्वी युतीचं सरकार व्हतं तवा १ रुपयांत झुणका-भाकर देणारी केंद्र सुरू केली व्हती.

संत्या -: तशीच जेवणाची थालीबी सगळीकडं मिळती नव्ह.

गण्या -: तवा शेरात गल्लीत गल्लीत झुणका-भाकर केंद्र सुरू झाली व्हती.

संत्या -: पण तवा गावा- गावात झुणका-भाकर केंद्र नव्हती.

गण्या -: तालुक्यात-जिल्ह्याच्या शेरात दिसायची.

संत्या -: आता मातर गावात किमान पंचकोशीत तरी १० रुपयात जेवणाच्या थालीचं केंद्र सुरू करा म्हनं.

गण्या -: सायबानी परचारात घोषणा करताच आता काही लोकांनी ती योजना सुरू पण केली. पर सत्तेवर आलेल्या सायबानी आजून काय त्यावर इचार केलेला दिसत न्हाय.

संत्या -: काय तर फकस्त शेरातच १० रुपयात थाळी मिळायची.

गण्या -: तुझं काय मत हाय यावर मन्या ?

मन्या -: घोषणा करणं वेगळं आणि तिची अंमलबजावणीकरणं वेगळं.

संत्या -: ते कसं काय ?

मन्या -: आपण केलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी तशी योजना तयार करावी लागते. 10 रुपयांत जेवण देण्याचे काम सरकारी पातळीवरून करणं अवघड आहे.

गण्या -: मग ही योजना कशी काय काय राबणार ?

मन्या -: एवा तर सरकार महिला बचत गटांला अनुदान देवून ही योजना राबवू शकते किंवा सामाजिक-स्वयंसेवी संस्थाकडून त्याची अंमलबजावणी केली जाऊ शकते.

संत्या -: मग तर सोपच हाय की.

मन्या -:  त्यासाठी लागणारी जागा कोण देणार?

गण्या -: संस्थेची असेल तर ठीक अन्यथा सरकारला ती उपलब्ध करून द्यावी लागेल.

संत्या -: झुणका-भाकर केंद्रासाठी तवा अशाच जागा दिल्या गेल्या न्हाय काय?

मन्या -: हो, पण ती योजना आता बंद पडली.

गण्या -: त्या झुणका भाकर केंद्राचे धाभे-हॉटेल मध्ये रूपांतर झालेलं दिसतंय.

संत्या -: सरकारनं दुसरी जागा देण्यापरिस ही झुणका भाकर केंद्रच त्यासाठी द्यायला काय हरकत हाय.

गन्या -: म्हंजे जागेची अडचण सुटला की नाय.

मन्या -: तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्यामुळे जागेचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल.

संत्या -: पण योजनेला गती तरी मिळंल.

गण्या -: आता ज्यांनी ही केंद्र ताब्यात घेतलीयत ते ही योजना राबवायला तयार व्हतील काय?

मन्या-: ते सांगणं अवघड आहे.

संत्या -: आरं गण्या आता त्या केंद्राचा मालक येगळा आन चालवणारा येगळा, आसू शकतो.     

गण्या -: ते बी बराबर हाय म्हाना.

मन्या -: तसा निर्णय झाला टीआर सरकार सर्व झुणका-भाकर केंद्राची पाहणी करील, माहिती घेईल.

संत्या -: त्यानं काय व्हनार?

मन्या -: त्यावरून मालक कोण आणि चालवतो कोण, हे कळेल.

गन्या -: त्याचा काय बी उपेग व्हनार नाय बग.

मन्या -:  तू असं का म्हणतोस ?

गन्या -: जवा बघायला सरकारी अधिकारी जातीला तवा मूळ मालक आधीच तिथं हाजिर व्हईल.

संत्या -: ते काय बी करा म्हण पण 10 रुपयात थाळी लवकर सुरू करा म्हण.

संत्या -: म्हंजे तुला बरं व्हाईल. एकट्यासाठी काय करायला नको. असं म्हण की.

संत्या -: पण त्यासाठी गावात ही योजना यायला हवी.

संत्या -: चला, त्यासाठी आपण आतापासूनच प्रयत्न करूया.

संत्या -: लागला दगड तर लागला

मागे

जनक्षोभाचा भडका
जनक्षोभाचा भडका

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्ववादी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आ....

अधिक वाचा

पुढे  

घोडा का अडला ?
घोडा का अडला ?

         घोडा का अडला ? भाकरी का करपली? तर त्याचं उत्तर न फिरवल्याने असं आ....

Read more