ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वडाच्या पारावार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावार

शहर : मुंबई

गण्या : संत्या आज पारावार यायला एवढा उशीर का ?

मन्या : असा सुतकी चेहरा का तुझा ?

संत्या : टीवीवर बातम्या बघित व्हतो. कोल्हापूर सांगलीतल्या महापूराच्या बातम्यांनी काळीज हालल बगा.

गण्या : आपल्याकडही  पावसानं धुंमशान घातलय. कुठ जाता येत न्हाय ? कुणाशी बोलायचं म्हटलं तर फोन      बंद.

मन्या : कुठ काय झालं तर बातम्यामदी जेवढं समजलं तेवढच . अनेक गावाचा संपर्कच तुटलाय.

संत्या : जवा लाइट येल तवाच बातम्या बघाया मिळत्यात.

गण्या : चार दिवसांनी लाइट पेटला म्हणून तुला बातम्या बघायला मिळाल्या . आमच्याकड आजूनबी      लाइट न्हाई.

मन्या : बातम्यामंदी एवढं काय बघितलंस?

संत्या : पूणे, कोल्हापूर,सातारा, नाशिक, सांगली मंदी महापूरच पाणी पाच दिवस झालं तरी काही कमी     झालेल नाही. कोल्हापूर, सांगलीला पुराच्या पाण्यान वेढले. लाखो लोकांना हलवलं. २७  की २८ जन     मेल, जनावरांच तर हाल इचरू नका. त्यांना चारा न्हाई की काय नाय. मुलाबाळाचीही तीच गत.

गण्या : त्यांना सरकार मदत करीत आसलं की ?

मन्या : त्याशिवाय का एवढ्या माणसांचं जीव वाचाल ?

संत्या : सरकारची मदतही अपुरी ठरते या . कुठ कुठ आणि कुणा कुणाला मदत करणार?

मन्या : सरकारकडे एवढी यंत्रणा हाय की.

गण्या :  पुरा जिल्हा पाण्यात हाय म्हणल्यावर सर्व ठिकाणी पावसातन कस जाणार

संत्या : सरकारच्या बोटी कमी पडल्या. जास्ती लक्ष शेरातच दिल गेल .

मन्या : अडचणीतल्या सर्वांना मदत कारण सरकारच काम हाय.

गण्या : मंत्री तिकडे गेले. मुख्यमंत्र्यांनी वरन बघितल विमानातन अस तू सांगतोय मग आता अडल कुठ ?

संत्या : आता कोन कुठ अडचणीत हाय ते सांगता येणार न्हाय. कारण सगळच ठप्प झालया. ट्रक गाड्या बी अडकल्यात पुरती दैना झालिया.

मन्या : म्हंजी हजारो कुटुंबाच्या संसारा धुवा केला म्हण की पुरान.

संत्या : आता सगळं नव्यानं उभ कराव लागणार.

मण्या : सरकार मदत करील की.

गन्या : आपल्याकडच्या संस्था, मंडळ, कलाकार बी मदत करतात, असा आजवरचा अनुभव हाय.

संत्या : तसा मदतीचा ओघ सुरू झालाय. पर कितीबी मदत केली तरी अपुरी ठरावी, अशी अवस्था हाय.   त्यात आजूनबी पानी कमी झालेल न्हाय .

गन्या : अशा येळेला येवढ्या परगत यंत्रणाही कुचकामीच ठरल्या म्हणायचं .

संत्या : निसरगापुढं कोणाचं काय बी चालत न्हाय. नजरेसमोर माणूस जानवर वाहत जात, त्याला                वाचवाता येत न्हाय. एवढे दिस झाले तरी पानी कमी करता येत न्हाय. अनेक लोकांना पाण्यात      दिवस काढव लागतात. अन्न पाण्यावाचून जीव वाचवायची धडपड माणस करताय,नावर     करतायत, अशी येळ आली तर काय म्हणायचं.

गन्या : माणसाच्या हातात काय बी न्हाई हेच खर

संत्या : माणूस दुसर्‍यावर अवलंबून असतो. म्हणजे माणसाचं जीवन निसरगावर अवलंबून असल्याच       यावरून पटत.

गन्या : तुला हे पटत न्हाय कार मन्या ?

मन्या : सर्व दुर्दशेला काही निसरगच कारण हाय आस मला वाटत न्हाय.

गन्या : मग आणखी काय येगळ कारण हाय.

मण्या : आपल्याकड कसलच नियोजन न्हाय बगा.

संत्या : यात नियोजनाचा काय समंध?

मन्या : धरण बांधली, शहर वसवताना कुठ बी, कुणीबी हवेल्या उभ्या केल्या धरणाच पानी वाढल की  नदीत सोडतात. मग नदी काठावर ची घर पाण्यात जाणार न्हायत काय ?

गण्या : त्यासाठी काय कराया हव व्हतं सरकारनं ?

मन्या : पुराच पाणू जिथ येऊ शकत तिथपर्यंत घर, इमारती, बंगले, बांधाया बंदी कराया हवी, तसच नद्यांचा गाळ उपासाया हवा. धरणाच पानी सोडण्याआधी माणसांना जनावरांना हलवायला हवं.  आपल्याबी हातात काही गोष्टी असत्यात अस मला वाटत.

संत्या : खर हाय तुझ, पर खाऊगिरी थांबणार नाय तोवर ह्या गोष्टी व्हतच रहाणार .

मन्या : मग फक्त निसरगालाच दोष देऊ नका. आपल्या चुका सुधारायला हव्या तर, अशा दुर्दशा  होणार्‍या घटनाचे प्रमाण घटेल, अन्यथा याहून अधिक दुर्दशा झालेली पहावी लागलं .

 

 

मागे

७२­ वर्षांनंतरचा भारत
७२­ वर्षांनंतरचा भारत

येत्या १५ ऑगस्टला भारताला स्वतंत्र होऊन ७२ वर्षे पूर्ण होत आहेत. आणखी तीन वर....

अधिक वाचा

पुढे  

स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी, भारत ब्रिटीशांच्या जोखड्यापासून स्वतंत्र झाला. प्र....

Read more