ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वडाच्या पारावर - #कोरोना - माझं गाव बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 25, 2020 01:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावर - #कोरोना - माझं गाव बंद

शहर : मुंबई

गण्या-:  अरे संत्या काय झालं इतका येळ केलास

मण्या  -: आर.. कुठं व्हतास तुला काय कसली काळजी नाय बघ

संत्या -: आर.. काय झालं जरा गावाला गेलतो गाडी चुकली ह्मणतांन  उशीर झाला

गण्या-: गावातल्या पंचानी मिटिंग बलवली व्हती ठावं नव्हतं व्हय तुला

संत्या-: आर.... रस्त्यात अडकलो काय करू सांग गाडी काय माझ्या बापाची हाय व्हय

मण्या-: आर.. जरा लवकर निघायचं काम आटपून

संत्या-: ह्यो कोरोना आलाय ना पीडायला काय काम आटपणार,मग कशासाठी व्हती मिटिंग

गण्या -: ह्यो  कोरोनाच कि आणि काय दुसरं काय

संत्या -: त्यासाठी मिटिंग कश्याला पायजेत

मण्या -: आर.. गावात काय करायचं काय नाय ते सांगायला

संत्या-: ते कश्याला सांगायला पायजेत टीव्ही वर दिवस रात्र तेच सुरु हाय

गण्या -: म्हणजे

संत्या-: आर.. आपले मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पंतप्रधान,पोलीस,डाक्टर  समदी जण सांगा ल्यात   कि काय करायचं काय नाय ते

मण्या -: तस नव्ह

गण्या -: आर.. मण्या फिरून फिरून काय बोलालास सरळ सांग कि त्याला

संत्या -: काय झालं काय गावात काय झालं बिल नाय ना

मण्या -: नाय गावात काय नाय झालं

गण्या -: आर शहरातन तो कोरोना काय तो आलाय ना

मण्या -: त्याचबद्दल व्हती मिटिंग

संत्या -: त्याची मिटिंग इथं का ..

गण्या-: आर तू म्हणालास ना समदे मंत्री सांगल्यात काय करायचं काय करायच नाय ते

मण्या-: आर.. पण त्यांचं कोण मनावरचं घेईनात बघ

गण्या-: समदी  सांगल्यात घरात बसा,घराबाहेर पडू नका घोळका करू नका तरी बी लोक रस्त्यावर यांल्यात बघ

संत्या -: मग आता काय आपल्या गावातले पंच आपल्याला जावा म्हणत्यात काय त्यासनी सांगायला

गण्या-: तस  नव्ह .. मुंबईतली समदी लोक गावाकडं यायला निघाल्यात

संत्या-: मग बरोबरच हाय कि इतकं दिवस पाप काम नाय काय नाय काय खाणार ते मुंबईत

किती पैका लागतोय माहित नाय व्हय

मण्या -: आर.. हा कोरोना  गर्दी झाली आणि त्यात कुणाला कोरोना झाला असलं तर साम्द्यास्नी व्हतोय म्हण

गण्या -: म्हणतान पंचानी मिटींग बालवली व्हती

संत्या-: मग काय सांगितलं त्यांनी

गण्या-: गावातले समदे रस्ते बंद करायचे

संत्या-: तवाच रस्त्यावर दगड आणि लाकडं आडवी टाकल्यात व्हय

मण्या-: काय सांगणार समद्यांनी असा ठराव केलाय कि मुंबईपुण्यातुन कुणबी आलं तर गावात घ्यायचं नाय 

संत्या -: असं कस ते इथं आपल्या  गावात नाय येणार तर कुठं जाणार

गण्या -: मी बी तेच म्हणलं पण माझं कुणी बी ऐकाय नाय बघ

मण्या-: मी बी विरोध केला आमच्या घरातलं कुणी नाय म्हण पण गावातली पण आमचीच हाईत ना

संत्या-: बरोबर हाय कोरोना आलाय त्यात मुंबईकरांचा काय दोष

गण्या-: त्यांचं म्हणणं असं कि ते गावात आले तर आपल्याला बी व्हनार तो रोग

संत्या-: असं काय नाय ज्यांना कोरोना झालाय ते कशाला येतील गावालामुंबईला चांगले दवाखाने हाईत काय गावाला  

गण्या-: मी बी तेच म्हणलं आजारी लोक का येतील पण कुणी ऐकायलाच तयार नाय

संत्या -; असं तर हा कोरोना बाहेर च्या देशात झालाय मग तिथं आपले भारतातले लोक व्हते त्यांना आणलं कि मुंबईत अजून बी  आणाल्यात  तवा  मुंबईवाले म्हणाले व्हय त्यांना आणू नका

गण्या-: बरोबर हाय बघ तुझं

संत्या-: आर मुंबईकर दुसऱ्यासाठी जीव देतील पण आपल्या मूळ  कुणाच्या जीवाला धोका व्हायला देणार नाहीत

मण्या-: मी म्हणलो आपल्या गावात कुणाला मोठा आजार झाला तर हेच मुंबईकर आपल्या घरातलं मुंबईत कुणबी नसताना मुंबईला घेऊन जातात आणि आपल्या घरात नेऊन आपला इलाज करतात

गण्या-: मी बी म्हणलो या यंदा पावसानं आमचं समद गाव व्हाऊन गेलं जनावर गेली समद गेल कोण आलं धावून हेच मुंबईकर

संत्या-: तवा  त्यांनी म्हणलं असत जाऊदे मी गेलो तर मला रोग व्हईल,नाही म्हणलं त्यांनी असं ,आले धावून आपल्या गावासाठी

मण्या-: बरोबर हाय बघ तुझं पण आपल्या हातात काय हाय सर्वानी ठरवलं ते मान्य करावाच लागेल ना आता

संत्या -: घाबरू नका ... काय व्हनार नाय त्यांना

गण्या -: व्हय त्यांना या संकटातून लवकर देवाण बाहेर काढायला पायजेत बघ

संत्या-: आर ते मुंबईकर हाईत तुला नाय माहित त्यांचं काय म्हणत्यात ते

मण्या-: काय ....

संत्या -: आर ते म्हणत्यात ना मुंबईकरांच स्पिरिट काय काय ते

गण्या -: बरोबर हाय बघ मी बी बघितलंय तिथं सर्व जाती धर्माचे कुठण कुठण आलेले लोक राहत्यात

संत्या -: आर.. राहत्यात काय बाकीच्या येळेला हे भांडतील रुसतील पण मुंबईवर कुठलं बी संकट येउदे त्या संकटासंगं असं लढत्यात कि कुणी म्हणेल एकाच आईच्या पोटची पोर हाईत

गण्या -: बरोबर हाय बघ कायम येगळ्या येगळ्या राज्यातली धर्माची हि लोक मुंबईवर संकट आलं कि फक्त एकाच म्हणत्यात मी मुंबईकर,मी मुंबईकर

संत्या-: आताची कोरोनाची हि लढाई बी मुंबईकर जिकणारच बघशील तू  त्यांना गावात घ्या नाहीतर नको घ्या

मण्या-: ते तर खरंच हाय रे पण टीव्ही वर गावातले हे असे रस्ते अडवलेले बघून त्यांना वाईट वाटलं असेल म्हणून बाकी काही नाही.

संत्या -: असं काय समजू नको मुंबईकर अशा गोष्टी नाही मनावर घेणार देव ना करो पण आपण गावकरी अडचणीत आलो तर हेच मुंबईकर मदतीला आधी येणार

मण्या -: खरंच हाय बघ मगाशी मिटिंग चालू व्हती तवा मला शिव्याचा फोन आला व्हता..

संत्या-: काय म्हणत व्हता

मण्या-: म्हणत व्हता गावातील समदी कशी हाईत,गावातल्या म्हाताऱ्या आणि लहान मुलांची काळजी घ्या बाहेर सोडू नका

संत्या -:  मग तू काय म्हणालास

मण्या-: मी म्हंटल या गावाला समदी सगळं बंद हाय तिकडं तर मला काय माहित इथं असं ठरल ते

गण्या-: माझ्या तर डोळ्यात पाणी आलं बघ त्यानं समद्यांची आठवण काढून काळजी घ्या  म्हणल्यावर

संत्या -: मग आता .. कस व्हनार

गण्या-: काय नाय ते म्हणले आम्ही नाय येणार मुंबईतच राहणार

संत्या-: बघ तुला म्हणलं ना यालाच म्हणत्यात मुंबईकर आणि मुंबईकरांचं स्पिरिट

मागे

गुन्ह्यांचे प्रमाण कसे घटणार ?
गुन्ह्यांचे प्रमाण कसे घटणार ?

            गेल्या ८-१० दिवसांतील गुन्हेगारीच्या घटना पहाता समाजमन....

अधिक वाचा

पुढे  

वडाच्या पारावर - मुंबईकरांचा वाली कोण
वडाच्या पारावर - मुंबईकरांचा वाली कोण

गण्या -: अरे संत्या काय करतो हाईस र...   संत्या -: काय करू बसलोय बघ काय करणार ....

Read more