By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 17, 2020 08:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गण्या -: अरे संत्या काय करतो हाईस र...
संत्या -: काय करू बसलोय बघ काय करणार
गण्या -: चल कि मग जाऊन येऊ पारावर लई दिस झाले गेलो नाही बघ पारावर
संत्या -: आर.. या कोरोनान समदं बंद करून टाकलंय बघ
गण्या -: आर.. चल कि मग मण्याबी येतो म्हणालाय
संत्या -: चल तर मग जाऊन येऊ
मण्या -: आर... कधीपासनं वाट बघालोय कुठं हाईसा
गण्या -: आर.. संत्याला बालवायला गेलतो
मण्या -: या बसा
संत्या -: लई दिस झालेबघ पारावर येऊन
मण्या -: काय करणार या कोरोनान डोकंच फिरवलंय बघ चार महिने झालं
गण्या -: व्हय र...
संत्या -: आपलं तरी बर बाबा निदान शेतात तरी जात होतो काम वहीत होती
मण्या -: व्हय र.. त्या मुंबईवाल्यानी कसे हे दिवस काढले असतील देवालाच माहित
गण्या -: व्हय र.. मशीन सारखी धावणारी ती मुंबईची लोक कदम घरात कशी बसली असतील वेड लागायची पाळी आली असलं बघ त्यांच्यावर
संत्या -: काय करणार बिचारी सरकारनं असं कोंडीत पकडल्यावर स्वतःच्या गावाला यायची बी वाट ठेवली नाय बघ
मण्या -: आणि म्हण बाहेरून आलेल्या लोकासनि दीडशे कोटी खर्च करून त्यांच्या गावाला पाठवलं
गण्या -: हा मोठा अन्याय झाला बघ त्यांच्यावर त्यांना बी गावाकडं पाठवायची व्यवस्था करायला पाहिजे होती सरकारनं
संत्या -: आणि हे सर्व करून काय फायदा झाला काही नाही उलट आता लई लोक कोरोनान आजारी पडल्यात
मण्या -: पडणार नायतर काय सर्व चालू केलय आणि मुंबईतल्या लोकांनी कुठं जायायच नाय आणि मुंबईत कुणीबी यायचं कुठं बी राहायचं
गण्या -: आता सांग मग त्या लोकासनि एवढा पैका घालून पाठवायची गरज व्हती का?
संत्या -: काय गरज नव्हती बघ त्यांना तिथं खायायला मिळत व्हतं सर्व मिळत व्हतं त्यांचीच सेवा व्हतं होती तरी बी रस्त्यावर उतरले
मण्या -: त्यांनी एवढा समदा तमाशा केला आणि आता त्यांना बिनधास्त मुंबईत घ्यायल्यात काय म्हणावं या सरकारला
संत्या -: आर राजकारण हाय समद मत पाहिजेत कि त्यांना
मण्या -: कसली मत डोंबलाची त्यापैकी एकाच बी नाव नसल महाराष्ट्राच्या निवडणूक यादीत मतदान काय करणार ती
गण्या -: काय मिळवलं सरकारनं एवढं करून काय नाय बघ
संत्या -: यात पैसे खाणाऱ्यांनी आपले खिसे तेवढे भरून घेतले असतील बघ
मण्या -: आणि यांनी असं केलं म्हणून लॉकडाऊन फेल गेला बघ मुंबईचा आणि अजुनबी लोक जास्त कोरोनाची मिळाल्यात
गण्या -: डाक्टर म्हणत्यात २८ दिवसात हि साखळी तुटते मग २८ दिस हिबी समदी माणसं घरात बसली असती तर समद ठीक झालं असत बघ
संत्या -: आर.. त्यांच्या या वागण्यानं जे खरे मुंबईकर हाईत त्यांचे पोलिसांचे काम करणाऱ्या सर्वांचे हाल झाले बघ आणि याला सरकारच जबाबदार हाय काय बी म्हण तू
मण्या -: बराबर हाय बघ सरकारला जमलं नाही बघ ते फक्त घोषणा आणि भाषण देत राहिले टीव्ही वर येऊन या त्यापरीस या बाहेर येणाऱ्या लोकांना बंद करायला पायजे व्हतं
गण्या -: समद्यांना दोन दिस देऊन सांगून एक महिना समद बंद करायला पायजे व्हतं
संत्या -: रोडवर फक्त पोलीस आणि दवाखान्याच्या गाड्या आणि बाकी कुणी बी यायचं नाय असं करायला पाहिजे व्हतं
मण्या -: भाजी चालू किराणा चालू मग कस व्हनार एक महिन्याचा किराणा द्यायचा भरायला दोन दिस पुरे व्हते आणि भाजी नसली तर काय कोणी मेले नसते खायायच एक महिना कडधान्य नायतर झुणका भाकर
गण्या -: बराबर हाय बघ तुझं असच करायला पाहिजे व्हतं
संत्या -: आपल्या शेतकऱ्याचं बी जरा चुकलंच बघ
मण्या -: शेतकऱ्याचं काय चुकलं र ..
संत्या -: आर.. आपण भाजीपाला पाठवायलाच नको व्हता सडना व्हता शेतात काय मेलो असतो व्हय आपण
गण्या -: बरोबर हाय र तुझं आपण भाजीपाला पाठवला नसता तर ती लोक आलीच नसती रस्त्यावर
मण्या -: आसबी तो भाजीपाला परप्रांतीयांनी काळाबाजारानी विकून या कोरोना मध्ये त्यांनीच पैसा रगड कमावला आपल्या मराठी माणसांनी नाय
गण्या -: बराबर बोललास बघ
संत्या -: आता म्हणी एकदा हा भाग बंद एकदा दुसरा आणि कुणबी मुंबईत यायचं कुणी आडवत त्याचा काय फायदा सांग कास आवरणार हे नाय आवरणार बघ
मण्या -: त्या पाप बिचार्यांना गावालाही यायला बंदी घातलीय आता म्हणी गणपतीला यायचं असलं तर पंधरा दिवस आधी येऊन बाहेर राहायचं म्हण
गण्या -: म्हणजे अजूनही वनवास संपला नाही त्यांचा एकतर चार पाच महिने काम नाही पगार नाही ...
मण्या -: आणि गावी यायचं म्हंटल तर हे गाडीवाले लुटा ल्यात पायजे तस काय करणार
संत्या -: मला तरी वाटतंय बघ अजूनही येळ गेलेली नाय समद्यास्नी एक महिन्याचं सामान देऊन सगळं बंद म्हणजे बंद आस करायला पायजेत
मण्या -: काय नाय र सरकारनं सरळ हात वर केलेत बघ आता
गण्या -: काय झालाय माहित हाय तीन पक्षाचं सरकार विरोधात कोण बोलणार आणि जे विरोधात बसलेत ते काय बोलू शकत न्हाईत कारण त्यांचं केंद्रात सरकार ते बी जबाबदार हाईत च कि याला
संत्या -: बरोबर हाय बघ महाराष्ट्राचं कास होणार काय माहित हे असाच चालत राहील तर
मण्या -: आणि दवाखान्याचा तर बट्याबोळच झालाय बघ लूट लावलीय गरीबांन जगायचं कि मरायचं तेच कळत नाय बघ
गण्या -: चला आम्ही बोलून काय व्हनार कोणी वाली नाही बघ त्यांचा आणि आपला बी हे मात्र खर
मण्या - संत्या -: चला
गण्या-: अरे संत्या काय झालं इतका येळ केलास मण्या -: आर.. कुठं व्हतास तुला ....
अधिक वाचा