ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

वडाच्या पारावर - पुन्हा आश्वासने 

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 04:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावर   - पुन्हा आश्वासने 

शहर : मुंबई

गण्या -: काय रं मन्या बजेट म्हंजे काय?
संत्या -: आमाला समजल आसं सांग.
मन्या -: केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था वर्षाचा अर्थ संकल्प मांडतात.
गण्या -: काय समजलं गड्या.
मन्या -: म्हणजे आगामी वर्षात महसूल किती मिळेल? खर्च किती आणि कसा केला जाईल? कर कुठल्या वस्तूंवर अधिक लावलेत? कोणत्या वस्तूंचे कर कमी केले? कोणत्या क्षेत्रात किती रक्कम खर्च केली जाणार? कोणाला कसं सवलती आणि लाभ मिळणार याचं सारं चित्रण यात सादर केलं जातं.
संत्या -: त्यामुळे काय व्हतं? आपल्याला त्याचा काय फायदा?
गण्या -: त्याने काय फरक पडतो?
मन्या -: फरक पडतो तर. सरकारच धोरण त्यातून स्पष्ट होतं. शेतकरी, कामगारवर्ग, प्रत्यक्ष कर देणारे, उद्योजक-व्यापारी आणि सर्व सामान्य जनत, शिक्षण विभाग, सार्वजनिक क्षेत्र आदींवर त्याचा परिणाम होत असतात.
संत्या -: ते कसं काय बुवा?
मन्या -: म्हणजे एखाद्या वस्तूवर कर वादविला तर ती वस्तू महाग होते. उदाहरण द्याचं तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की आपोआप सर्व वस्तूंचे भाव वाढतात.
गण्या -: फायदा काय आनि कसा व्हतो?
मन्या -: एखाद्या वस्तूवरीलकर कमी केला की ती वस्तू स्वस्त होते.
संत्या -: धंदे वाले आणू कामगारांवर त्याचा कसा परिमाण व्हतो?
मन्या -: जर एखाद्या वस्तूंवर कर वाढविला तर आपोआप ती वस्तू महाग होते. आनि मग त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. कारण वस्तू महाग झाली की, त्याचा खप कमी होतो.
गण्या -: मग मालच संपला काय तर धंदेवाल्यांना पैसा मिळत नाय.
संत्या -: पैसा नाय म्हणून ते धंदा बंद करतात.
गण्या -: धंदा बंद झाला की कामगार बेकार व्हतो.
मन्या -: शिवाय उद्योगात पैसे गुंतविणारांना सवलती दिल्या नाहीत तर ते गुंतवणूक करीत नाहीत.
संत्या -: सरकारला पैसा कुठून मिलतो?
मन्या -: कराच्या रूपाने सरकारला पैसा मिलतो?
गण्या -: आणखी कुठून मिलतो?
मन्या -: सरकारी मालमत्ता विकूनही मिलतो
संत्या -: पण त्या का विकतात?
मन्या -: कारण त्या तोट्यात असतात. त्यांच्यावर कर्ज वाढलेले असते. त्यामुळे त्या विकण्याशिवाय पर्याय राहत नाही.
गण्या -: आणखी काय आसतं बजेटमध्ये?
मन्या -: रास्ते, विमान, रेल्वे, शेतकरी आदीवर सरकार किती खर्च करणार कोणत्या नव्या योजना सरकार राबवणार हेही यातून स्पष्ट केले जाते.
संत्या -: मग या बजटमध्ये नव्या काय घोषणा होईल
मन्या -: या बजेटमध्ये घोषणाच घोषणा आहेत. हे करणार, ते करणार? असंच आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलयं.
गण्या -: त्यात नवीन काय हाय?
मन्या -: काही नाही !      

 

 

मागे

स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा पाऊस 
स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा पाऊस 

        सध्या जागतिक पातळीवर आर्थिक मंदी आहे. भारतालाही या मंदीचा फटका ....

अधिक वाचा

पुढे  

गुन्ह्यांचे प्रमाण कसे घटणार ?
गुन्ह्यांचे प्रमाण कसे घटणार ?

            गेल्या ८-१० दिवसांतील गुन्हेगारीच्या घटना पहाता समाजमन....

Read more