ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

१० वी पास मुलांना नाबार्डमध्ये नोकरीची संधी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 11:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

१० वी पास मुलांना नाबार्डमध्ये नोकरीची संधी

शहर : मुंबई

        मुंबई - NABARD सोबत नोकरी करण्याची एक चांगली संधी आहे. NABARD मध्ये ग्रुपसी साठी काही खाली पदं भरायची आहेत. ऑफिस अटेंडेंटच्या या जागा आहेत. तुम्हाला अर्ज करायचा असेल, तर शेवटची तारीख 12 जानेवारी 2020 आहे.


       ग्रुप 'सी' के ऑफिस अटेंडेंट या पदासाठी काम असेल. तसेच एकूण 73 जागा भरणार असल्याची नाबार्डची माहिती आहे. या पादासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. जे दहावी पास झालेले आहेत, असे सर्व उमेदवार यासाठी पात्र आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रॅज्युएट तसेच त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांनी यासाठी अर्ज करू नका, तो बाद होईल.


       अर्जदाराचं वय कमीत कमी 18 वर्ष असलं पाहिजे, तसेच 1 डिसेंबर 2019 पर्यंत उमेदवाराचं वय 30 वर्षाच्या आत असलं पाहिजे. या जागेसाठी निवड प्रक्रिया पहिल्या दोन टप्प्यात होईल. पहिल्यांदा टेस्ट होईल, त्यानंतर तुमच्या भाषेची चाचणी होईल. या सर्व परीक्षा ऑनलाईन होतील. सर्वात पहिली चाचणी ही 120 गुणांची असेल. यात रिजनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, अंक गणिताशी संबंधित प्रश्न असतील.


        मुख्य परीक्षेत जे उमेदवार प्राथमिक चाचणीत उत्तीर्ण होतील, तेच उमेदवार मुख्य परीक्षा देण्यास पात्र ठरतील. मुख्य परीक्षेत 150 गुणांचे प्रश्न विचारले जातील. यात प्राथमिक स्तरावरील प्रश्न, तसेच स्वाभाविक कल, नैसर्गिक क्षमता किंवा कौशल्य, सामान्य जागृकता, इंग्रजी भाषा याच्याशी संबंधित प्रश्न असतील, यासाठी 150 गुणांच्या परीक्षेसाठी 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे. या परीक्षा तुम्ही हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत देऊ शकतात.


        उमेदवारांना या परीक्षेसाठी 450 रूपये द्यावे लागणार आहेत. याशिवाय एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ईएक्सएस कॅटेगरीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क 50 रूपये असणार आहे.
 

मागे

येणा-या वर्षांत तरुणांसाठी भरघोस नोक-या
येणा-या वर्षांत तरुणांसाठी भरघोस नोक-या

           मुंबई – येणार्याी वर्षांत कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळण....

अधिक वाचा

पुढे  

चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास….
चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास….

अनेक जण आपल्या मित्रांना, कुटुंबियांना पैसे पाठवताना नेटबँकिंग, मनी ट्रान्....

Read more