ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा !

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 09:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निराशा वा परीक्षेत अपयश आल्यावर आत्महत्येचा विचार करणे, हा वेडेपणा !

शहर : मुंबई

काही वर्षांपूर्वी माध्यमिक किंवा महाविद्यालयीन परीक्षांचे निकाल लागले की, अपयशी विध्यार्थ्यांच्या आत्महत्यांची तुरळक वृत्ते ऐकायला मिळत. आतातर प्रेमभंग, निराशा, अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचे कडक बोलणे, एखादी गोष्ट मनासारखी होणे आदी कारणांमुळेही विद्यार्थी सर्रास आत्महत्या करतात ! वर्ष २०१० च्या प्रारंभी ४३१ हून अधिक विध्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

आत्महत्येचा विचार का अयोग्य ?

         ‘आत्महत्या करणे, हा काही समस्येवरील उपाय नव्हे, उलट तो तर शुद्ध पळपुटेपणाच आहे. आत्महत्येचे विचार येणार्या मुलांनी पुढील विचार करावा. आत्महत्येसाठी केवळ एकच कारण असते, तर जगण्यासाठी अनेक कारणे असतात, उदा

 

  • मला माझ्या माता-पित्यांचे प्रेम अनुभवायचे आहे.

 

  • मला मित्र-मैत्रिणींसमवेत खेळण्याचा आनंद लुटायचा आहे.

 

  • माझ्या देशात अनेक सुंदर गोष्टी आहेत, त्या मला पहायच्या आहेत.

 

  • मला आजूबाजूचे लोक आणि निसर्ग यांकडून नवीन नवीन गोष्टी शिकायच्या आहेत.

 

  • जन्मदात्या आई-वडिलांना वृद्धपणी सांभाळण्याचे दायित्व (जबाबदारी) माझ्यावर आहे.

 

         छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर यांसारखे राष्ट्रपुरुष; तर संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज यांसारखे संत यांनाही अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या. त्यांच्या तुलनेत स्वतःला होणारा त्रास किती आहे, याचा विचार करावा. आज भोगावे लागणारे दुःख काळाच्या ओघात नष्टसुद्धा होईल !

आत्महत्येवरचा खरा उपाय म्हणजेसाधना !

         विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होण्याचे खरे कारण म्हणजेमनाची दुर्बलता. ध्यानधारणा, नामजप यांसारखीसाधना केल्यानेच मनोबल वाढून जीवनात स्थिरता येते. असा विद्यार्थी आत्महत्येच्या विचारावर सहज मात करतो.अशा प्रकारचे प्रयोग निरनिराळ्या महाविद्यालयामधूनही केले गेले आहेत आणि त्यांना यामुळे अभ्यासात लाभ दिसून आला आहे. यासाठी मुलांनो, मनोबल वाढवण्यासाठी आजपासूनच साधनेला आरंभ करा !

मागे

प्रत्यक्ष अभ्यास असा करावा !
प्रत्यक्ष अभ्यास असा करावा !

मुलांनो, आपण पहातो की, दोन मुले सारखीच बुद्धीमान (हुशार) असली, तरीसुद्धा त्या....

अधिक वाचा

पुढे  

SSC Result 2019 : ऑनलाइन निकाल उद्या १ वाजता
SSC Result 2019 : ऑनलाइन निकाल उद्या १ वाजता

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या ८ जून रोजी दुपारी १ वाजता  ऑ....

Read more