ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कशी पडली महिन्यांची नावे?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कशी पडली महिन्यांची नावे?

शहर : मुंबई

जानेवारी -: रोमन देवता जेनस वरून जानेवारी नाव पडले. या देवाला दोन तोंडे असल्याची आख्यायिका आहे. त्याचप्रमाणे जानेवारीमध्‍ये मागील वर्षाला न विसरता नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.

फेब्रुवारी -: या महिन्याची उत्पत्ती रोमन उत्सव फेब्रआ पासून झाली.

मार्च -: रोमच्या बुद्धदेवते मार्टियुस अर्थात मार्स यावरून मार्च महिन्याचे नाव ठेवण्यात आले.

एप्रिल -: लॅटिन भाषेच्या एपिरर या शब्दावरून एप्रिल शब्द आला. या शब्दाचा अर्थ आहे ‘उघडणे’.

मे -: मे महिन्याचे नाव रोमची देवी मायमा वरून निघाले.

जून -: स्वर्गाची राणी जुनो वरून जून हे नाव ठेवण्यात आले.

जुलै -: ज्युलियस सीझर या महिन्यात जन्माला आला, म्हणून जुलै.

ऑगस्ट -: रोमचा राजा ऑगस्टसने याच महिन्यात बर्‍याच ठिकाणी विजय मिळवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या महिन्याला ऑगस्ट नाव देण्यात आले.

सप्टेंबर -: पूर्वीच्या काळी रोम कॅलेंडरनुसार हा महिना सातवा होता. हे नाव लॅटिन भाषेवरून घेण्यात आले. ज्याचे नातं सात या आकड्याशी आहे.

ऑक्टोबर -: या महिन्याचे नावदेखील लॅटिनच्या ऑक्टोमवरून निघाले. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्‍ये या महिन्‍याला आठवे स्थान होते. मात्र, आता हा दहावा महिना आहे.

नोव्हेंबर -: या महिन्याचे नाव लॅटिन भाषेच्या नोव्हेनवरून घेण्यात आले. कारण त्या काळात कॅलेंडरनुसार हा महिना नवा होता.

डिसेंबर -: लॅटिन भाषेच्या डिसेमवरून डिसेंबर नाव पडले. ज्याचा अर्थ दहावा असा होता. आता हा वर्षाचा शेवटचा आणि बारावा महिना आहे.

 

मागे

दहावी-बारावीच्या गुणपद्धती मोठा बदल
दहावी-बारावीच्या गुणपद्धती मोठा बदल

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून दहावी अकरावी व बारावीच्या गुणपद्धती बदल करण....

अधिक वाचा

पुढे  

अनुदानित शाळांचे अनुदान केले कमी , शिक्षकांचे आंदोलन सुरूच 
अनुदानित शाळांचे अनुदान केले कमी , शिक्षकांचे आंदोलन सुरूच 

शंभर टक्के अनुदानित शाळांचे वीस टक्के अनुदान केल्याने शिक्षकांमध्ये तीव्....

Read more