ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चला भाकरी खाऊ, चला शाळेत जाऊ

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 12:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चला भाकरी खाऊ, चला शाळेत जाऊ

शहर : मुंबई

सरकारने मध्यान्ह भोजन योजनेमध्ये ज्वारी आणि भाकरी च समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता  मुलांना शाळेत खिचडी, वाटाणा, मटकी,लाप्सी सोबतच ज्वारी आणि बाजारी ची भाकरीही मिळू शकणार आहे. त्यामुळे शालेय 1ली  ते 8 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना अधिक पोषक आहार मिळू शकेल.

सरकारने विद्यार्थ्यांना अधिक पोषक आहार मुलांना मिळावे म्हणून हा निर्णय  घेतला आहे. अस असलं तरीही शाळा प्रशासन त्रस्त झाले आहे. कारण शाळेतील शिक्षकाना ह्या कामात लावले जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

भारतीय अन्न महामंडळाकडून या योजनेसाठी अन्नाचा पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या चालू असलेल्या योजनेत खुप अडचणी आहेत. कधी शिधा कमी पडतो तर कधी स्वयंपाकी उपलब्ध नसतो तर स्वयंपाकींच मानधन ही कमी असल्याने त्यांचा काम करण्याचा उत्साह दिसून येत नाही .त्यामुळे शाळा प्रशासन नाराज आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी अपेक्षा शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे.

मध्यान्ह  पोषण आहार योजना

मध्यान्ह पोषण आहार 22 नोव्हेबर 1995 सुरवात झाली. 2002 मध्ये योजनेचे स्वरूप बदलून शाळेतच अन्न देण्यात आले. 2008 मध्ये 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थांचा  या योजनेत समावेश करण्यात आला  .अन्न  शिजवण्याचे काम एनजीओ, महिला बचत गट यांच्याकडून केले जाते  दरमहा 1000 रु स्वयंपाकी आणि मदतनीस यांना दिले जाते.

मागे

इंग्रजी भाषा आत्मसात करण्याची सोपी पध्दत
इंग्रजी भाषा आत्मसात करण्याची सोपी पध्दत

कुठलीही भाषा आत्मसात करणे, म्हणजे दुसर्‍याने बोललेली किंवा लिहिलेली भाषा ....

अधिक वाचा

पुढे  

'आयडॉल' च्या परीक्षेत बीएच्या 236 विद्यार्थ्यांना '0' गुण
'आयडॉल' च्या परीक्षेत बीएच्या 236 विद्यार्थ्यांना '0' गुण

मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल  आणि मुक्त शिक्षण विभागाने (आयडॉल) घेतलेल्या....

Read more