ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळली ; दहावीच्या निकालात पिछाडी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 07:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महापालिका शाळांची गुणवत्ता ढासळली ; दहावीच्या निकालात पिछाडी

शहर : पुणे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंतांची संख्या कमी होत आहे. गतवर्षी महापालिका शाळांचादहावीचा निकाल ८५.०१ टक्के लागला होता. यावर्षी हा निकाल ६६.६४ टक्के लागला आहे. २०.६४ टक्क्यांंनी घटला आहे. महापालिकेतील लाखांचे बक्षीस मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंधराने घटली आहे. केवळ तीनच विद्यार्थी लखपती झाले. महापालिकेने ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एक लाखाचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. यावर्षीच्या निकालानुसार तीनच विद्यार्थीं लखपतीच्या बक्षिसास पात्र ठरले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अठरा शाळा आहेत. यापैकी पिंपळे  सौदागर येथील माध्यमिक विऱ्यां द्यालयातील दोन, थेरगाव माध्यमिक विद्यालयातील एक अशा एकूण तीन विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या पुढे गुण प्राप्त केले आहेत. यांना एक लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

८० टक्क्यांंहून अधिक  गुण मिळविलेल्यांमध्ये पिंपळे सौदागर येथील माध्यमिक विद्यालयातील तेरा, थेरगावातील पाच, रूपीनगर येथील तीन, निगडीत दोन, संत तुकारामनगर येथील एक, क्रीडा प्रबोधिनी दोन, लांडेवाडी, भोसरी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी, पिंपळे गुरव, वाकड, केशवनगर, आकुर्डी, काळभोरनगरातील प्रत्येकी एका अशा एकूण ३४ विद्यार्थ्यांनी ८० ते ८५ टक्के गुण मिळविले आहेत. त्यांना पंचवीस हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

तर, ८५ टक्क्यांंहून अधिक गुण मिळविणाऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. पिंपळे सौदागरमधील दोन, भोसरी आणि केशवनगर माध्यमिक विद्यालयातील प्रत्येकी पाच, पिंपळे सौदागर, क्रीडा प्रबोधिनी, थेरगाव, आकुर्डी विद्यालयातील प्रत्येकी दोन अशा एकूण २१ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एका विद्याथ्यार्ला ८५ ते ९० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थ्यांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

गुणवंतांसाठी बक्षीस योजना

महापालिकेतर्फे  ८० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार केला जातो. ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्याथ्यार्ला एक लाख, ८५ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्यास पन्नास हजार रुपये आणि ऐंशी टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते.

मागे

SSC Result 2019 : ऑनलाइन निकाल उद्या १ वाजता
SSC Result 2019 : ऑनलाइन निकाल उद्या १ वाजता

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या ८ जून रोजी दुपारी १ वाजता  ऑ....

अधिक वाचा

पुढे  

नियोजन कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा !
नियोजन कौशल्य शिका आणि जीवन आनंदी बनवा !

 नियोजन          ‘नियोजनाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण उदा....

Read more