ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 8 डिसेंबर 2019 रोजी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 04:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 8 डिसेंबर 2019 रोजी

शहर : मुंबई

पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेण्यात येणारी इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी असणारी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षा 8 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात येणार आहे.

सन 2007-2008 पासून इयत्ता आठवीतील नियमित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. शासनमान्यअनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील इयत्ता आठवीतील नियमित विद्यार्थीच राज्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी पात्र ठरतील.

या परीक्षेसाठी बसणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन आवेदनपत्रे शाळांसाठी 30 ऑगस्ट 2019 पासून परीक्षा परीषदेच्या  www.mscepune.in  आणि  http://nmms.mscescholarshipexam.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहेत. सर्व शाळांनी ऑनलाईन आवेदनपत्रे सर्व माहिती व चलनासह 3 ऑक्टोबर 2019 पूर्वी पूर्ण करुन संबंधित शिक्षणाधिकारीजिल्हा परिषदा/ शिक्षण निरीक्षक मुंबई यांचेकडे त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह सादर करावयाची आहेतअसे पुण्याच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

मागे

प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाचा 48 हजारहून अधिक शाळांना लाभ
प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाचा 48 हजारहून अधिक शाळांना लाभ

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 48 हजार 561 शा....

अधिक वाचा

पुढे  

विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवून कोट्यवधी रुपयांच्या सरकारी निधीची लूट
विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवून कोट्यवधी रुपयांच्या सरकारी निधीची लूट

       चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील कोडशी आश्रम शाळेत हा गैरप्रकार उघड....

Read more