ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

  अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

  अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

शहर : मुंबई

 अमिताभ बच्चन यांची 2018 दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. विशेष म्हणजे 2019 साली अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट सात हिंदुस्थानी रिलीज होण्यास 50 वर्षे झाली आहेत. 11 ऑक्टोबर 1942 रोजी तत्कालीन अलाहाबाद (सध्याच्या प्रयागराज) येथे जन्मलेल्या अमिताभ यांचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' 1969 मध्ये प्रदर्शित झाला होता. ख्वाजा अहमद अब्बास लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोव्याला पोर्तुगीज राजवटीपासून मुक्त करणार्‍या सात हिंदुस्थानींच्या कथेवर आधारित होता. यात उत्पल दत्त, मधु, ए.के. हंगल आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते.

दादासाहेब फाळके पुरस्कार

दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील भारतीय आजीवन योगदानाबद्दल देण्यात येणारा वार्षिक पुरस्कार आहे. याची सुरुवात 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांचा जन्म. अभिनेत्री देविका राणी यांना प्रथमच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये आणि स्वर्ण कमल असे आहे.

मागे

तनुजा यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ‘पितृऋण’ या चित्रपटाचा विशेष शो
तनुजा यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ‘पितृऋण’ या चित्रपटाचा विशेष शो

पुण्यातल्या भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सुरु असलेल्या 14 व्या ....

अधिक वाचा

पुढे  

अमिताभ बच्चन यांचे राज्यपालांकडून अभिनंदन
अमिताभ बच्चन यांचे राज्यपालांकडून अभिनंदन

 महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादा....

Read more