ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नाट्य निर्मिती अनुदान योजनेची सुधारीत नियमावली जाहीर

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 12:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नाट्य निर्मिती अनुदान योजनेची सुधारीत नियमावली जाहीर

शहर : मुंबई

राज्य शासनामार्फत नवीन नाट्य निर्मिती करणाऱ्या संस्थांना नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेत यापूर्वी व्यावसायिक व संगीत नाटकांसाठी राज्यातील सहा महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक होते. आता नवीन नियमानुसार सहा महसूली विभाग ऐवजी चार महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक आहेअशी सुधारणा करण्यात आली आहे.

 तसेच प्रायोगिक नाटकांनाही जास्तीत जास्त अनुदान मिळावे यासाठीचे नियम सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. प्रायोगिक नाटकांना अनुदान मिळण्यासाठी असणारा जो पहिला १० चा टप्पा होतातो आता कमी करण्यात आला असूनपहिल्याच टप्प्यात ५ प्रयोगांचे अनुदान घेता येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात सहा महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग करण्याची अट आता शिथिल करण्यात आली असूनआता फक्त दोन महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग सादर करावयाचा आहे. तसेच नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी आवश्यक असणारी पोलीस परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नाट्यप्रयोग सादरीकरणाचा यापूर्वी नसलेला कालावधी या नियमावलीत निश्चित करण्यात आला आहे. ही योजना ही सन २००६ पासून सुरू करण्यात आली आहे. अनेक जुन्या नाट्य निर्मात्यांबरोबर नवीन नाट्य निर्मातेही या योजनेचा लाभ घेत असतात. परंतुमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाट्यगृह नसल्यानेज्या महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यगृह नाहीतत्या जिल्ह्यात नाट्यप्रयोग करणे शक्य नसल्यानेही अट शिथिल करण्याची विनंती नाट्य निर्मात्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांना केली. त्याची दखल घेत या योजनेतील काही अटी आता शिथिल करण्यात आल्या असूनयामुळे नाट्य निर्मात्यांना ज्या जिल्ह्यात सुस्थितीत नाट्यगृह आहेअशा महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यप्रयोग करण्यास मान्यता देण्यात आली आहेअशी माहिती श्री. तावडे यांनी दिली. व्यावसायिक निर्मात्यांबरोबर प्रायोगिक रंगकर्मींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच यामुळे जास्तीत नाट्य नाट्यनिर्मिती होऊन नाट्यरसिकांना दर्जेदार नाटकं पाहता येणार आहे. नाट्य क्षेत्रातील नाट्य निर्मात्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

मागे

आयफा पुरस्कार सोहळा संपन्न
आयफा पुरस्कार सोहळा संपन्न

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडेमीचा 20 वा पुरस्कार सोहळा मुंबईत दिमाखात पार पड....

अधिक वाचा

पुढे  

तनुजा यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ‘पितृऋण’ या चित्रपटाचा विशेष शो
तनुजा यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ‘पितृऋण’ या चित्रपटाचा विशेष शो

पुण्यातल्या भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सुरु असलेल्या 14 व्या ....

Read more