ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रीय महिला आयोगाने लैंगिक गैरवर्तणुकीचा अनु मलिकवर केलेला खटला बंद

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 06:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रीय महिला आयोगाने लैंगिक गैरवर्तणुकीचा अनु मलिकवर केलेला खटला बंद

शहर : मुंबई

       अभिनेत्री तनुश्री दत्ताने दोन वर्षांपूर्वी नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत #Metoo मोहिमेला सुरुवात केली होती. लैंगिक शोषणाचे नाना पाटेकरांसोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांवर आरोप झाले. #Metoo मोहिमे अंतर्गत प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करण्यात आले होते. पण त्यांच्यावरील हा खटला अतिरिक्त पुरावे न मिळाल्यामुळे बंद करण्यात आला आहे.

 

        अनु मलिक विरोधात खटला राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाखल करण्यात आला होता. पण हा खटला आता पुरावे न मिळाल्याने बंद करण्यात आल्यामुळे अनु मलिक यांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भातील वृत्त एका माध्यमाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार अनु मलिक यांच्या विरोधात पुरावे न मिळाल्याने खटला बंद करण्यात आला आहे. पुन्हा अनु मलिक यांच्या विरोधात एखाद्या महिलेने पुरावे सादर केले तर खटला पुन्हा सुरु करण्यात येईल, असे राष्ट्रीय महिला आयोग प्रमुख रेखा शर्मा यांनी म्हटले आहे.


       अनु मलिक यांना या आरोपांमुळे रिअॅलिटी शो इंडियन आयडॉल पर्व १० मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण इंडियन आयडॉल पर्व ११मध्ये पुन्हा त्यांची एण्ट्री झाली. त्यांच्या एण्ट्रीने सोशल मीडियावर खळबळ उडल्यामुळे नंतर अनु मलिकने स्वत: शोमधून काढता पाय घेतला. श्वेता पंडित आणि सोना मोहापात्रा यांनी अनु मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. परंतु या सर्व आरोपांचे अनु मलिक यांनी खंडन केले.
 

मागे

नीना गुप्ताची इच्छा आहे की जर ती वेळेत परत आली तर ही एक गोष्ट बदलली पाहिजे
नीना गुप्ताची इच्छा आहे की जर ती वेळेत परत आली तर ही एक गोष्ट बदलली पाहिजे

नीना गुप्ता हे भारतीय चित्रपटात काम करणारे नाव आहे, मात्र वेळेत परत येऊ शकती....

अधिक वाचा

पुढे  

इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' चा ट्रेलर प्रदर्शित
इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' चा ट्रेलर प्रदर्शित

        मुंबई - इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव्ह आज कल' चित्रपटचा ट्रेलर न....

Read more