ठळक बातम्या वास्तुदोष दूर करण्यासाठी मुख्य दाराजवळ नेहमी ठेवा…..    |     अवलंबा पाणी पिण्याचे 5 नियम.    |     हिवाळ्यात उटणे हे फायदेशीरच.    |     सत्ता कोणाची येणार ?.    |     आमचं बिनसलयं.    |    

विचार करायला लावतो बाला सिनेमा

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 10:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विचार करायला लावतो बाला सिनेमा

शहर : देश

स्टार : आयुष्मान खुराना, यामि गौतम, भूमी पेंडणेकर, जावेद जाफरी, सौरभ शुक्ला

डायरेक्टर : अमर कौशिक

स्टार : 3.5

आयुष्मान सध्या एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्याचे सिनेमे सर्वांवर खूप प्रभाव टाकतात. त्याच्या प्रत्येक सिनेमाच्या वेळी दमदार अभियानाची अपेक्षा केली जात आणि यावेळी असाच दमदार बाला सिनेमातून आयुष्मान लोकांना भेटायला आलाय. समाजाने काळाप्रमाणे बदल केला आहे असे म्हटले जाते पण परिस्थिति काही वेगळीच असते.

काय आहे कथा

सिनेमात एका टक्कल पडलेल्या व्यक्तीचे कथा मांडण्यात आलीय. डायरेक्टरने केसगळतीचा जो विषय आहे तो खूपच छान पद्धतीने हाताळला सोबतच सावळेपणपणाबद्दलही समाजातील स्थिति चांगल्यापणे समोर आणली. ही कथा बालमुकुंद (आयुष्मान खुराना) ची आहे. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. बालपणी  बालमुकुंद उर्फ बाला (आयुष्मान खुराना) चे लांब आणि सिल्की केस असतात. यामुळे तो लोकप्रिय असतो असे म्हणता येईल. पण जसे जसे तो मोठा होऊ लागतो त्याला केस गळतीची समस्या होते. 25 वर्षाचा होईपर्यंत टक्कल पडते. त्याच्या टक्कलपणाची समाजात चेष्टा केली जाते. नोकरीत ही त्याचे एग्जिक्यूटिव पदावरून डीमोशन होते. त्याच लग्न ही होत नसते. यादरम्यान बालाचे वडील त्याला केसांचा विग गिफ्ट करतात. यानंतर त्याच आयुष्य बदलते. परंतु त्याची मैत्रीण लतिका त्रिवेदी (भूमि पेडणेकर) कायम चिडवत असते. याचदरम्यान त्याची ओळख परी मिश्रा (यामी गौतम) हीच्याशी होते. परी आणि बाळाची जवळीक वाढते त्यांचं लग्न ठरत पण ऐनवेळी ट्विस्ट येतो. बालाच लग्न होतं काय ? बाला समाजात काही बदल आणतो? यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावं लागणार.

एक्टिंग

आयुष्मान खुरानाला पाहताना इतर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष्य जात नाही. भूमी पेडणेकर आणि यामी गौतम त्यांच्या व्यक्तिरेखेत उत्तम प्रकारे फिट बसतात. भूमीने तिच्या डार्क स्किन लूकमध्ये चार चांद लावलेत. तसेच बालाचे वडील सौरभ शुक्ला व लतीकाची आई सीमा पाहवा आणि बालाचा भाऊ धीरेंद्रकुमार गौतम यांनी चांगला अभिनय केला आहे.

सिनेमा का पाहावा ?

टक्कल पडल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या प्रकारचा त्रास होतो हे तुम्ही मोठ्या स्क्रीनवर आयुष्मान खुरानाच्या माध्यमातून पाहू शकता. अर्थात आयुष्मान पुन्हा एकदा तुमचे मन जिंकेल.

मागे

अभिताभ बच्चन : 50 वर्षांपूर्वी अशी झाली रुपेरी पडद्यावरील प्रवासाला सुरुवात
अभिताभ बच्चन : 50 वर्षांपूर्वी अशी झाली रुपेरी पडद्यावरील प्रवासाला सुरुवात

50 वर्षांपूर्वी एक हिंदी फिल्म रिलीज झाली. नाव होतं - सात हिंदुस्तानी ख्वाज....

अधिक वाचा