ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पेट्रोल दर वाढीवर बॉलिवूडकर गप्प का? नाना पटोलेंचा सवाल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 18, 2021 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पेट्रोल दर वाढीवर बॉलिवूडकर गप्प का? नाना पटोलेंचा सवाल

शहर : मुंबई

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार सहीत अन्य बॉलिवूडकरांना इंधन दरवाढीच्या विषयावर आवाज का नाही उठवत? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यूपीए सरकारच्या काळात जेव्हा इंधनचे  वाढले होते, तेव्हा अनेक बॉलिवूडकरांनी ट्विटरच्या माध्यामातून प्रश्न उपस्थित केले होते. आजही पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत, तर आता हे कलाकार गप्प का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत पेट्रोल डिझेल दर वाढीबद्दल मुद्दा उपस्थित केला. जेव्हा यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल डिझेलचे दर वाढले होते, तेव्हा अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांनी ट्विट केलं होतं. पण आता ते गप्प बसले आहेत, असं नाना पटोले म्हणाले.

त्यांनी ट्विट करत देखील बॉलिवूडकरांवर निशाणा साधला. 'युपीए सरकार लोकशाही मार्गाने  चालणारे सरकार होते, म्हणून 70 रूपये लिटर पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारसह अन्य सेलिब्रिटींनी इंधन दर वाढीविरोधात ट्विट करत संताप व्यक्त केला होता.'

पण आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण मोदी सरकारच्या हुकूमळाही विरोधात बोलण्याची कोणाला हिंम्मत नाही असं देखील नाना पटोले ट्विटरच्या माध्यमातून बोलले आहेत.

मागे

पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?
पूजा चव्हाण आत्महत्या ते भाजपकडून संजय राठोडांचं थेट नाव; आतापर्यंत काय काय घडलं?

टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उ....

अधिक वाचा

पुढे  

कंगनाला पुरवण्यात आलेल्या 'Y' दर्जाच्या सुरक्षेसाठी 'इतक्या' रूपयांचा खर्च
कंगनाला पुरवण्यात आलेल्या 'Y' दर्जाच्या सुरक्षेसाठी 'इतक्या' रूपयांचा खर्च

बॉलिवूडमधील कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी आभिनेत्री कंगना रनौत पुन्हा ए....

Read more