ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो', मनसे-शिवसेनेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूची माफी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 29, 2020 10:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो', मनसे-शिवसेनेच्या दणक्यानंतर जान कुमार सानूची माफी

शहर : मुंबई

‘कलर्स वाहिनीच्या ‘बिग बॉस (Bigg Boss 14) या रियालिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन मनसे आणि शिवसेना आक्रमक झाल्यानंतर VICOM 18 पाठोपाठ आता जान कुमार सानू यानेदेखील माफी मागितली आहे जानने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वादंग उठल्यानंतर बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवण्यात आलं. यावेळी त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करण्यास मनाई असल्याचं सूचित करण्यात आलं. त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात सर्वप्रकारच्या भाषा, जाती-धर्माच्या लोकांचं स्वागत केलं जातं, असंदेखील ठणकावून सांगण्यात आलं. त्यानंतर जानने माफी मागितली

“माझ्याकडून नकळत एक चूक झाली, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावं, असा माझा हेतू नव्हता. माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन, अशा शब्दात जान याने माफी मागितली.

दरम्यान, बिग बॉस शोमध्ये जान कुमार सानू याने मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी बुधवारी (28 ऑक्टोबर) राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 24 तासांच्या आत माफी मागण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रिकरण बंद पाडण्याची धमकी दिली होती. यानंतर कलर्स या मनोरंजन वाहिनीने माफीनामा दिला.

तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनीही कलर्स वाहिनीच्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या स्पर्धकाची शोमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. अन्यथा चित्रीकरण बंद पाडण्याचा इशारा दिला होता. यानंतर काही तासांपूर्वी कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील या प्रकरणी माफीनामा सादर केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना सादर केलेला माफीनामा इंग्रजी भाषेत होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या इंग्रजी भाषेतील पत्रात अपोलॉजी (Apology) हा शब्द वापरण्यात आला आहे.

कलर्स टीव्हीचा माफीनामा!

या प्रकरणी माफी मागताना, कलर्स टीव्हीने यां पत्रात म्हटले की, ‘कलर्स वाहिनीवर 27 ऑक्टोबरला प्रसारित करण्यात आलेल्या एपिसोडमध्ये मराठी भाषेसंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी मिळाल्या.

आम्ही या आक्षेपांची नोंद केली आहे आणि आम्ही ते ज्या ठिकाणी बोललं गेलं आहे तो भाग प्रसारित होणाऱ्या सर्व एपिसोड्समधून काढतो आहोत.

मराठी भाषेसंदर्भातील वक्तव्याने महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखवली गेली, याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक अमूल्य आहेत. शिवाय सगळ्या भाषा सन्मानीय आहेत.’

मागे

दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी NCBची धाड; पाहा पुढे नेमकं काय झालं....
दीपिकाच्या मॅनेजरच्या घरी NCBची धाड; पाहा पुढे नेमकं काय झालं....

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकराची चौकशी सुरु असतानाच या प्....

अधिक वाचा

पुढे  

Aashram 2: भक्तीच्या नावावर अपराधाला प्रोत्साहन; काशीवाल्या बाबाचं खरं रूप
Aashram 2: भक्तीच्या नावावर अपराधाला प्रोत्साहन; काशीवाल्या बाबाचं खरं रूप

भक्तीच्या नावावर अपराधाला प्रोत्साहन देणाऱ्या 'आश्रम' या वेब सीरिजमध्य....

Read more