ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Kangana Ranaut ला न्यायालयाचा मोठा झटका, फ्लॅटवरील कारवाई रोखण्याचा अर्ज फेटळाला

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 02, 2021 10:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Kangana Ranaut ला न्यायालयाचा मोठा झटका, फ्लॅटवरील कारवाई रोखण्याचा अर्ज फेटळाला

शहर : मुंबई

महाराष्ट्र राज्यातील (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारविरोधात टीकास्त्र सोडण्याचीची मोहीम राबविणाऱ्या कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगनाने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.

'कंगनाचे परवानगीशिवाय तीन फ्लॅट्स एकत्र'

उपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.'

कंगना रनौत हिला बसला झटका

त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे. मार्च 2018 मध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकीने (BMC) तिच्या खार फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम कामासाठी अभिनेत्रीला नोटीस बजावली. पण त्यानंतर ही बाब मागे पडली होती.

BMC टीमने कंगनाचे कार्यालय तोडले

दरम्यान, यापूर्वी बीएमसीच्या पथकाने अनधिकृत बांधकाम केल्याच्या आरोपावरून कंगना रनौत हिच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्या विरोधात कंगना रनौत हिने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले. तोडफोडी चुकीची असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) फटकारले होते.

मागे

भन्साळींच्या ‘गंगुबाई’मागे वादाचा ससेमिरा, आणखी एका कायदेशीर नोटिसीशी सामना!
भन्साळींच्या ‘गंगुबाई’मागे वादाचा ससेमिरा, आणखी एका कायदेशीर नोटिसीशी सामना!

सध्या अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ प्रचं....

अधिक वाचा

पुढे  

शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरनं थाटलं नवं कार्यालय, काय आहे किंमत?
शिवसेना प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकरनं थाटलं नवं कार्यालय, काय आहे किंमत?

हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर य....

Read more