ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

SSR Case : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी NCB कडून 'सावधान इंडिया'च्या दिग्दर्शकाची सहा तास चौकशी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2020 10:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

SSR Case : ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी NCB कडून 'सावधान इंडिया'च्या दिग्दर्शकाची सहा तास चौकशी

शहर : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) धडक कारवाई सुरु आहे. या प्रकरणी एनसीबीने सोमवारी (19 ऑक्टोबर) ‘सावधान इंडियाचा दिग्दर्शक सोहेल कोहली याची चौकशी केली

सोहेल कोहली हा चित्रपट निर्माता आहे. त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांची निर्मिती केली आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण भारतीय नागरिक असलेला अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्सकडून याला अटक करण्यात आली होती. अ‍ॅगिसिलोस याच्या चौकशीत सोहेल कोहलीचं नाव समोर आलं. त्यामुळे एनसीबीने सोहेल याला चौकशीसाठी बोलावलं.

सोहेलची एनसीबीकडून काल जवळपास सहा तास चौकशी झाली. याशिवाय त्याची आजदेखील चौकशी होणार आहे. सोहेल याच्यावर ड्रग्जचं वितरण करणं आणि सेवन करणं याबाबत गंभीर आरोप आहेत. त्याच अनुषंगाने एनसीबीकडून चौकशी करण्यात आली

बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीकडून कसून तपास सुरु आहे. याप्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे एनसीबीकडून आता बड्या दिग्दर्शकांनादेखील समन्स बजावण्यात आले आहेत. या दिग्दर्शकांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा अर्जुन रामपालचा मेहुणा

अ‍ॅगिसिलोस डेमेट्रियड्स हा अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ आहे. अ‍ॅगिसिलोस याच्या चौकशीत अनेक बड्या दिग्दर्शकांची नावे समोर आली आहेत. एनसीबीने सर्व दिग्दर्शकांना समन्स बजावले आहेत. त्याचबरोबर अ‍ॅगिसिलोस याला अटक केली आहे.

आतापर्यंत 23 जणांना अटक

ड्रग्सप्ररणी (Bollywood Drugs Connection) एनसीबीने आतापर्यंत तब्बल 23 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांत सिंह राजपूतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत यांचा समावेश आहे. यांच्यासह ड्रग पेडलर जैद, बासित परिहार आणि अन्य काही जणांचा समावेश आहे.

याप्रकरणी रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) 7 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला आहे. तब्बल 28 दिवसानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. याआधी 3 वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

मागे

...म्हणून चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ठेवले, दिग्दर्शकाकडून खुलासा
...म्हणून चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ठेवले, दिग्दर्शकाकडून खुलासा

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अभिनेता अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' चित्र....

अधिक वाचा

पुढे  

Kangana Ranaut : मुंबई पोलिसांचं ठरलं, कंगनाला चौकशीला बोलावणार
Kangana Ranaut : मुंबई पोलिसांचं ठरलं, कंगनाला चौकशीला बोलावणार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला (Kangana Ranaut) मुंबई पोलीस चौकशी बोलावणार आहेत (Mumbai Poli....

Read more