ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सागर देशमुखसमोर आता नवं आव्हान

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 28, 2019 02:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सागर देशमुखसमोर आता नवं आव्हान

शहर : मुंबई

भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे. बायोपिक सिनेमे, ऐतिहासिक मालिका यात प्रेक्षक रमतात. प्रेक्षकांना जितक्या निव्वळ करमणूकप्रधान मालिका पाहायला आवडतात, तितक्याच वास्तववादी मालिकाही. म्हणूनच आता पुन्हा एकदा इतिहासाची काही महत्त्वाची पानं आपल्या समोर येणार आहेत. स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून.सामाजिकराजकीयआर्थिकशैक्षणिकपत्रकारिताकायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचं हे महानकार्य मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ वाहिनी करणार आहे. भीमजी रामजी आंबेडकरयांचा प्रवास हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरइथपर्यंत झाला. ही नवी मालिका १५ एप्रिलपासून रात्री ९.०० वाजता  स्टार प्रवाहवर सुरू होतेय.

मागे

शिवाजी महाराजांचे सौरभ गोखलेने मानले आभार
शिवाजी महाराजांचे सौरभ गोखलेने मानले आभार

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अ....

अधिक वाचा

पुढे  

अभिनेत्री अमीषा पटेलवर फसवणूकीचा गुन्हा दाखल
अभिनेत्री अमीषा पटेलवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलवर पुन्हा एकदा फसवणूकीचा आरोप लावण्यात आला आह....

Read more