ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तनुश्री दत्तावर 25 कोटींचा मानहानीचा दावा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 13, 2020 06:38 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तनुश्री दत्तावर 25 कोटींचा मानहानीचा दावा

शहर : मुंबई

अभिनेते नाना पाटेकर यांच्या ‘नाम स्वयंसेवी संस्थेनं अभिनेत्री तनुश्री दत्ताविरोधात 25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे.

#MeToo चळवळी दरम्यान तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याचबरोबर तनुश्रीनं नाना पाटेकर यांनी नाम फाऊंडेशनच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचे ही आरोप केले होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार केला असून संस्थेच्या नावाने परदेशातून कोट्यावधींच्या देणग्या घेतल्या, असे आरोप तनुश्रीनं केले होते.

संस्थेचा हा पैसा कुठे जातो ? गरीब विधवांना वर्षातून एकदा साड्या वाटून फोटो काढायचं हे यांचं काम. तसेच कोल्हापूर पूरग्रस्तांना 500 घरं देणार असल्याचे म्हटले होते, त्याचं काय झालं? असे प्रश्न तनुश्रीने विचारले होते.या आरोपानंतर ‘नाम संस्थेनं तनुश्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, या खटल्याच्या सुनावणीवेळी तनुश्री अनुपस्थित होती. संस्थेने उच्च

न्यायालयात याचिका दाखल केली. यात तनुश्री दत्ताने एका पत्रकार परिषदेत त्यांच्या संस्थेवर आरोप केले. त्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली आहे. असे सांगण्यात आले आहे.

 

मागे

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची परवड, 'म्होरक्या'ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची परवड, 'म्होरक्या'ला महाराष्ट्रात एकही थिएटर नाही

अमर देवकर दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘म्होरक्या’ला ....

अधिक वाचा

पुढे  

चुकलो... क्षमस्व! 'त्या' वादग्रस्त फोटोवर निलेश साबळेकडून दिलगिरी व्यक्त
चुकलो... क्षमस्व! 'त्या' वादग्रस्त फोटोवर निलेश साबळेकडून दिलगिरी व्यक्त

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला आजवर प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली....

Read more