ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राष्ट्रपती राजवटीचा फटका नाट्यसंमेलनाला नाही, अद्याप संमेलन ठरलंच नाही : नाट्यपरिषद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 12:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राष्ट्रपती राजवटीचा फटका नाट्यसंमेलनाला नाही, अद्याप संमेलन ठरलंच नाही : नाट्यपरिषद

शहर : मुंबई

राज्यात राष्ट्रपती राजवटीमुळे शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं.पण जी गोष्ट ठरलीच नाही, ती पुढे कशी जाणार असा सवाल नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी विचारला आहे. नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याची बातमी एका वृत्तवाहिनीनं चालवली, पण ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचं प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केलं.

मुळातचं नाट्य संमेलन कुठे करायचं, कधी करायचं, नाट्यसंमेलाध्यक्ष कोण? याबाबत काहीच ठरलं नसताना तारीख पुढे ढकलली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. नाट्यपरिषदेची यावर बैठक अजून व्हायची आहे. त्यामुळे या गोष्टी अजून काहीच ठरल्या नाही. त्यामुळे अनुदान, इतर खर्च, घडोमोड़ी यावर आत्ताच चर्चा का करायची? आता नुकतीच राष्ट्रपती लागवट लागली आहे, पण नाट्यसंमेलन शक्यतो फेब्रुवारी किंवा त्यानंतर होत असतं. त्यामुळे त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही. एवढचं काय तर संमेलन राष्ट्रपती राजवटीमुळे पुढे जाते आहे, सत्ता स्थापनेला जेवढा उशीर होईल तेवढं संमेलन पुढे जाईल असं म्हणणं चुकीचं आहे. चुकीच्या बातम्या पेरल्यामुळे लोकांचा संभ्रम होतो. तसेच, तुमची विश्वासार्हता कमी होते, त्यामुळे कुठलीही शहानिशा करता अशी बातमी चालवू नका, अशी विनंती प्रसाद कांबळी यांनी माध्यमांना केली.

100 व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मोहन जोशी आणि जब्बार पटेल या दोन मातब्बरांमध्ये चुरस आहे. त्यामुळे संमेलनाध्यक्ष कोण असणार, शतक महोत्सवी नाट्यसंमेलन कुठे होणार, कधी होणार याबद्दल नाट्यपरिषद अधिकृत घोषणा कधी करते याकडे नाट्यप्रेमी तसेच रंगकर्मींचे लक्ष लागलं आहे.

 

मागे

विचार करायला लावतो बाला सिनेमा
विचार करायला लावतो बाला सिनेमा

स्टार : आयुष्मान खुराना, यामि गौतम, भूमी पेंडणेकर, जावेद जाफरी, सौरभ शुक्ला ड....

अधिक वाचा

पुढे  

 तान्हाजीचा  ट्रेलर प्रदर्शित
तान्हाजीचा ट्रेलर प्रदर्शित

बहुचर्चित सिनेमा तान्हाजी द अनसंग वॉरियरचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजय देवग....

Read more