ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नालासोपारामध्ये विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 08:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नालासोपारामध्ये विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू

शहर : virar

नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे यथील आनंद व्ह्यू या इमारतीत ही दुर्घटना घडली. सुनील चावरिया (30), प्रदीप सर्वाय (25) आणि बिका बुम्बाक (25) अशी मृतांची नावे आहेत. कंत्राटदाराने सफाईसाठी एकूण सहा कामगारांना आणले होते. रात्री जेवण झाल्यानंतर साडेबाराच्या सुमारास काम सुरू करण्यात आले. सर्वप्रथम एक कामगार सेप्टिक टँकमध्ये उतरला होता. मात्र, टाकीत प्रवेश करताच उग्र वासामुळे तो गुदमरला आणि खाली कोसळला. त्याला वाचवण्यासाठी अन्य दोघेजण टँकमध्ये उतरले असता या तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कामाचे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदाराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सोसायटीच्या व्यवस्थापन समिती सदस्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मास्क आणि ग्लोव्हज न घालता कामगार टँकमध्ये कसे उतरले, या मुद्द्यावर तपास केला जाणार आहे.

मागे

गडचिरोलीमध्ये बालसेना बसस्थानकांच्या स्वच्छेता मोहिमेवर 
गडचिरोलीमध्ये बालसेना बसस्थानकांच्या स्वच्छेता मोहिमेवर 

गडचिरोलीमधील मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथील बसस्थानकाची काही दिवसांपूर....

अधिक वाचा

पुढे  

कच्छच्या किनार्‍यावर सापडली पाकिस्तानी बोट
कच्छच्या किनार्‍यावर सापडली पाकिस्तानी बोट

गुजरातमधील कच्छ समुद्रकिनार्‍यावर एक पाकिस्तानी बोट सापडल्याने खळबळ माज....

Read more