ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 07:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाड शहरात ५ मजली इमारत कोसळली, शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

शहर : रायगड

महाड शहरात पाच मजली ईमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या ईमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. ईमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या इमारतीत ४७ फ्लॅट्स होते. जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली आहे. अशी माहिती काँग्रेस नेते माणिक जगताप यांनी दिली आहे. पोलीस आणि शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.

'जवळपास २० ते २५ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दुर्घटना मोठी आहे.' अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.

ईमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. प्रशिक्षित लोकांच्या मदतीने मदतकार्य केलं जात आहे. लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

 

मागे

महाराष्ट्रात ई-पासची सक्ती कायम राहणार : अनिल देशमुख
महाराष्ट्रात ई-पासची सक्ती कायम राहणार : अनिल देशमुख

अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत मोठी घोषणा केली. केंद्राने ई-पास आवश्यक नसल्याच....

अधिक वाचा

पुढे  

आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण
आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या सं....

Read more