ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेळगावात भीषण अपघातात ट्रक-बस जळून खाक

By SEJAL PURWAR | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2019 02:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बेळगावात भीषण अपघातात ट्रक-बस जळून खाक

शहर : बेळगाव

    खानापूर-बेळगाव चोली राज्य महामार्गावर खानापूर तालुक्यात कालमणी क्रॉसपासून काही अंतरावर असलेल्या ढाब्याजवळ तुंडरंग-पणजी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. बसमधील ४ प्रवासी किरकोळ भाजून जखमी झाले. मध्यरात्रीची वेळ असल्याने बसमध्ये मोजकेच प्रवासी होते. त्यामुळे आगीचा भडका उडाल्यानंतर उतरण्यासाठी चेंगराचेंगरी न होता पुरेसा वेळ मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.

कर्नाटक परिवहन मंडळाची बस गोव्यावरून टूनडरंगी(कर्नाटक) जात होती. रात्री साडेबाराच्या सुमारास काळमणी क्रॉसजवळ बेल्गाववरून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या मालवाहू ट्रकला बसची जोराची धडक बसली. बसच्या धडकेत ट्रकच्या डिझेलची टाकी फुटल्याने घर्षणाने दोन्ही वाहनांनी पेट घेतला. तेव्हा बसमध्ये २१ प्रवासी होते. मात्र चालक व वाहकाने प्रवाशांना तात्काळ खाली उतरवून घेतेले.         

        

मागे

उद्योगांना कमी कार्बन उत्सर्जन प्रकारात वळवण्याची घोषणा
उद्योगांना कमी कार्बन उत्सर्जन प्रकारात वळवण्याची घोषणा

जगभरातल्या सर्वाधिक हरित वायू उत्सर्जन करणाऱ्या उद्योगांना कमी कार्बन अर....

अधिक वाचा

पुढे  

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सहाव्या भारत जल सप्ताहाचे उद्‌घाटन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सहाव्या भारत जल सप्ताहाचे उद्‌घाटन

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सहाव्या भारत जल सप्....

Read more