ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

सोन्याची अंगठी चोरताना अभिनेत्री स्नेहलता पाटीलला अटक

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2020 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोन्याची अंगठी चोरताना अभिनेत्री स्नेहलता पाटीलला अटक

शहर : पुणे

          पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात एनआयबीएम रोडवरील प्लाझा मॉलमधील एका ज्वेलरीच्या दुकानात सोन्याची अंगठी चोरताना स्नेहलता पाटील ही अभिनेत्री सीसीटीव्ही कॅमेरात दिसून येताच पोलिसांनी तिला अटक केली आहे. सोन्याच्या दोन अंगठ्या चोरल्याचा तिच्यावर आरोप आहे. 

       या संदर्भात अधिक माहिती अशी की, अभिनेत्री स्नेहलता पाटील प्लाझा मॉलमधील एक ज्वेलरीच्या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने गेली. तेथे तिने दुकानदाराला वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या दाखविण्यास सांगितले. दुकानदार अंगठ्या दाखविण्यास गुंग असतानाच तिने चलाखीने दोन अंगठ्या चोरल्याचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. अशाप्रकारे तिला चोरी करताना रंगेहात पकडण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. स्नेहलताने तीन हिंदी चित्रपाटांमध्ये काम केले आहे. 

मागे

ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू
ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू

          बेळगाव : खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावरुन जाणारा....

अधिक वाचा

पुढे  

"तारक मेहता..." चे मेकअप आर्टिस्ट आनंद परभार यांचे निधन 

            मुंबई : घराघरात लोकप्रिय ठरलेल्या आणि प्रेक्षकांना खळखळून ....

Read more