ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

शरद पवारांआधीच आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं पडळकरांकडून उद्घाटन, तर आव्हान देताना म्हणाले...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 12, 2021 10:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

शरद पवारांआधीच आहिल्याबाईंच्या पुतळ्याचं पडळकरांकडून उद्घाटन, तर आव्हान देताना म्हणाले...

शहर : पुणे

जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र भाजप आमदारानं गनिमी कावा करत आज पहाटेच हे उद्घाटन केल्याचा दावा केल्यानं गोंधळ उडाला. या अनावरणावरून राजकीय वर्तुळात वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

जेजुरी देवस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला होता. याचं अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते 13 फेब्रुवारीला करण्यात येणार होतं. त्यासाठी सगळी तयारी देखील पूर्ण झाली होती. याला भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी विरोध दर्शवला.

 

पहाटे भाजप आमदार पडळकर यांनी उद्घाटन केल्याचा दावा केला आणि एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी पडळकर यांना पुतळ्याजवळ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण खंडेरायाच्या साक्षीनं धुमधडाक्यात झालं आहे असा दावा पडळकर यांनी केला. त्यामुळे शरद पवार यांनी पुन्हा उद्घाटन करू नये, असं पडळकर यांनी शरद पवारांना आव्हान दिलं आहे. तर आतषबाजी आणि धुमधडाक्यात युवा मित्रांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण केल्याचा दावा पडळकर यांनी केला आहे.

मागे

कोरोना | शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली
कोरोना | शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली

कोरोनामुळे यंदाची शिवजंयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याबाबत राज्य सरका....

अधिक वाचा

पुढे  

एक इंच जमीन कोणाला देणार नाही, घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले: संरक्षण मंत्री
एक इंच जमीन कोणाला देणार नाही, घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले: संरक्षण मंत्री

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना भारत-चीन सीमेवरील परिस....

Read more