ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पालघर जिल्ह्याला सावधानतेचा इशारा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 05, 2019 06:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पालघर जिल्ह्याला सावधानतेचा इशारा

शहर : पालघर

पालघर जिल्ह्याला आठ तारखेपर्यंत 'महा' नावाच्या चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसणार आहे. तसेच मच्छिमारांनी दोन ते तीन दिवस मच्छिमारीसाठी समुद्रात जाऊ नये. जिल्ह्यातील एकूण ६७ गावे समुद्र किनारी आहे. गावांमध्ये तात्पुरता निवारा व्यवस्था करण्यात आली असून ६ ते ८ तारखेपर्यंत चक्रीवादळाच्या प्रभावानुसार शाळा कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. अरबी समुद्रात रौद्ररुप धारण केलेलं 'महा' चक्रीवादळ पुढच्या २४ तासांत गुजरात किनारपट्टीकडे प्रस्ताव करण्याची शक्यता आहे.

६ नोव्हेंबरला मध्यरात्री ते ७ नोव्हेंबरच्या पहाटे तीन वाजेपर्यंत ते पोरबंदर दरम्यान धडकण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे गुजरात तसंच उत्तर कोकणातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  महाराष्ट्रातील पालघर, ठाणे जिल्ह्यांसह नंदुरबार, धुळे, नाशिक या पाच जिल्ह्यांत वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत हे वादळ आणखी तीव्र होईल आणि त्यानंतर त्याचा जोर थोडा कमी होत जाईल.

मागे

जीवंत व्यक्तीला मृत दाखवून परस्पर विकले फ्लॅट
जीवंत व्यक्तीला मृत दाखवून परस्पर विकले फ्लॅट

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे सध्या गायब झालेत. जीवंत व्....

अधिक वाचा

पुढे  

बँकाच्या 7 हजार कोटींच्या फसवणूकीप्रकरणी सीबीआयचे 169 ठिकाणी छापे
बँकाच्या 7 हजार कोटींच्या फसवणूकीप्रकरणी सीबीआयचे 169 ठिकाणी छापे

देशातील प्रमुख सुमारे 15 बँकाची 7 हजार कोटी रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी के....

Read more