ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी, पुण्यात 12 ते 14 जानेवारी दरम्यान भरती, फक्त 10 वी पासची अट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 08, 2021 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय लष्करात महिलांसाठी मोठी संधी, पुण्यात 12 ते 14 जानेवारी दरम्यान भरती, फक्त 10 वी पासची अट

शहर : पुणे

पुण्यात महिलांसाठी लष्कर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील युवा महिलांना रोजगार मिळावा या उद्देशानं ही भरती केली जाणार आहे. 10 वी उत्तीर्ण महिला आणि मुलींसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आर्मी इन्स् ट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर 12 ते 14 जानेवारीदरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमधील महिलांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. या भरतीमध्ये 10 वी उत्तीर्ण महिला अर्ज करु शकतात. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या मेल आयडीवर नावनोंदणी करणं गरजेचं आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक भरुनच अर्ज सबमिट करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

कशी असेल भरती प्रक्रिया?

ज्या उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त झालं आहे. अशा महिला उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थित राहायचं आहे. शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. जे उमेदवार पात्र ठरले असतील त्यांची संपूर्ण तपासणी करुनच भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. शारिरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील त्या उमेदवारांना लष्करी पोलिस दलात दाखल करुन घेतलं जाणार आहे.

पोलीस भरतीबाबत जीआर जारी

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठीएसईबीसीचे आरक्षण(SEBC) ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला आहे. ‘एसईबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. राज्य सरकारनं याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा, असा निर्णय घेण्यात आला आहे.

मागे

हेमंत नगराळे पूर्णवेळ डीजीपी कधी होणार? 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी काय करत होते?
हेमंत नगराळे पूर्णवेळ डीजीपी कधी होणार? 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी काय करत होते?

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार काल आयपीएस अधिका....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात
भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात

थंडीच्या कडाक्यामुळे सध्या संपूर्ण देशाभर शीतलहरी सुरू आहेत. हवामानातील ब....

Read more