ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कृत्रिम पाऊस पाडणार अमेरिकेचे विमान उद्या औरंगाबाद मध्ये येणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 15, 2019 05:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कृत्रिम पाऊस पाडणार अमेरिकेचे विमान उद्या औरंगाबाद मध्ये येणार

शहर : जालना

गेले काही दिवस मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयोग चालू असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत होते. पण ते प्रत्यक्षात पाणी असणाऱ्या जागांची पाहणी करण्यासाठी विमान सोडण्यात येत होते, कारण पाऊस पाडणारे विमान आपल्याकडे नाही. यावर टीका होताच आता कृत्रिम पाऊस पाडणार अमेरिकेनं विमान उद्या औरंगाबादमध्ये दाखल होणार असल्याचे राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केले आहे. मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सलग दोन दिवस प्रयत्न करण्यात आले, पण ते असफल ठरले. त्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे 17 तारखेला ते विमान भारतात दाखल होईल. अहमदाबादमध्ये कस्टम विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून 18 तारखेला विमान औरंगाबाद मध्ये विमानतळावर प्रयोगासाठी सज्ज असेल असे सांगण्यात आले.

मागे

उध्वस्त पूरग्रस्तांचे संसार उभे करण्याचे आव्हान आहे :  मुख्यमंत्री
उध्वस्त पूरग्रस्तांचे संसार उभे करण्याचे आव्हान आहे :  मुख्यमंत्री

आज राज्यात पूरपरिस्थिती आहे. सरकार आणि इतर सर्व यंत्रणांनी पूरग्रस्तांना स....

अधिक वाचा

पुढे  

 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन
 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त राष्ट्....

Read more