ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांनी घेतली शपथ, फडणवीसांनाही टाकलं मागे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 29, 2020 01:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

देशातील सर्वात तरुण महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांनी घेतली शपथ, फडणवीसांनाही टाकलं मागे

शहर : देश

केरळची राजधानी तिरुअनंतपुरमच्या इतिहासात एक नवीन मैलाचा दगड जोडला गेलाय. तिरुअनंतपुरमच्या महापौर आर्या राजेंद्रन झाल्या असून, त्यांनी संपूर्ण देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान पटकावलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (CPM) या महत्त्वाच्या पदासाठी 21 वर्षीय आर्य राजेंद्रनवर जबाबदारी सोपवलेली असून, आर्या तिरुअनंतपुरमच्या पुढील महापौर झाल्यात.

महापौरपदी आर्य राजेंद्रन यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सीपीएम जिल्हा सचिवालयानं घेतला होता. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ते मुदावणमुगल येथून नगरसेवक म्हणून निवडून गेल्या. आर्या या निवडणुकांमध्ये सीपीएमच्या सर्वात तरुण उमेदवार होत्या. देशातील सर्वात तरुण महापौर आर्या सध्या बीएससी (गणित) ची विद्यार्थिनी आहेत.

आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर आहे. ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाल्या असून, ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे.

आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयन तर आई एलआयसी एजंट

आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करतात. तर, तिची आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते. केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांच्या लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रंटने विजय मिळवला आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफ प्रथम क्रमांकावर, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली.केरळमधील स्थानिक निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीनं मोठा विजय मिळवला आहे. 10 जिल्हा परिष, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएफला विजय मिळवला आहे. तर भाजपनं 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. आर्या राजेंद्रन केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरमची महापौर होणार आहे.

मागे

Karnataka विधानपरिषदेत आमदारांनी खुर्चीवरुन खेचलेले उपसभापती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत
Karnataka विधानपरिषदेत आमदारांनी खुर्चीवरुन खेचलेले उपसभापती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत

कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळांव....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापूरच्या अपक्ष आमदाराचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा
कोल्हापूरच्या अपक्ष आमदाराचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा

वस्त्रोद्योगासह लघु उद्योगाचे प्रलंबित प्रश्न ठाकरे सरकारने 15 जानेवारीपर....

Read more