ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दोन BMC आयुक्त हवेच, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतरही अस्लम शेख ठाम

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2021 10:37 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दोन BMC आयुक्त हवेच, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतरही अस्लम शेख ठाम

शहर : मुंबई

मुंबई महानगरपालिकेत दोन आयुक्त ठेवावे, हिच माझी मागणी आहे. मी यावर ठाम आहे काँग्रेस नेते आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा हे स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत एकच आयुक्त असेल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही अस्लम शेख यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करत मागणीवर ठाम असल्याचं म्हटलं.

एक आयुक्त काय करु शकतो, हे तुम्ही दाखवून दिलं, असं म्हणत मुख्यमंत्री आयुक्त इक्बाल चहल यांचं कौतुक केलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षरित्या दोन आयुक्तांच्या मागणीबाबत त्यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच, स्वत: काँग्रेसच्या नेत्यांनेही अस्लम शेख यांना घरचा अहेर देत ही मागणी फेटाळली होती.

मीरा-भाईंदर काँग्रेस तर्फे पक्ष बांधणी

येणाऱ्या काळात मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणूक लक्षात ठेवून मीरा-भाईंदर काँग्रेस तर्फे शहरात पक्ष बांधणीचा कार्यक्रम सुरु करण्यात आलेली आहे. अस्लम शेख महाराष्ट्र राज्य मंत्री यांचा उपस्थितीत जवळपास अडीचशे नागरिक काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केले, तर तीनशे कार्यकर्त्यांना पद वितरण करण्यात आलं.

यावेळी अस्लम शेख मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी म्हणाले, “ओएनजीसीचा सर्वेक्षणाचा जिथे जिथे मच्छिमारांने विरोध आहे. केंद्र सरकार कडून जिथे जिथे नवीन प्रकल्प लादण्याचा काम सुरु आहे. महाविकास आघाडीचा नेता म्हणून सरकारचा विरोध असणार आहे. मच्छिमारांना बाजूला ठेवून आम्ही कुठल्याही काम हाती घेणार नाही. आमच्या सरकार मच्छिमारांना सोबत घेवून चालणार आहे. बायोटॉयलेटमध्ये त्याला उचलण्यासाठी काय करावे लागेल त्यासाठीही विचार सुरु आहे.”

मुबंईत दोन आयुक्तांच्या मागणीवर मी ठामपणे उभा आहे. जेव्हा नवीन मागण्या होत असतात त्यावर काही ना काही टीका होत असते. परंतु मुंबईची लोकसंख्या ज्या प्रकारे वाढली आहे. जी लोकसंख्या दिल्लीत आहे, तिथे तीन महानगरपालिका आहे. माझी नवीन पालिकेची मागणी नाही. मुंबई महानगरपालिकेत दोन आयुक्त ठेवावे, हिच माझी मागणी आहे, मी यावर ठाम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अस्लम शेख यांची मागणी शिवसेनेने धुडकावली

मुंबई महापालिकेला दोन महापालिका आयुक्त देण्याची काँग्रेसची मागणी शिवसेनेने धुडाकवून लावली आहे. मुंबई महापालिकेला दोन आयुक्त नकोच, एकच आयुक्त पुरेसा आहे, असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे

मुंबई महापालिका हे एक क्षेत्र आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला एकच आयुक्त पुरेसा आहे. मुंबईचा कारभार एकछत्री व्हायचा असेल तर एकच आयुक्त योग्य आहे. मुंबईला दोन आयुक्त देण्याची गरज नाही, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. यापूर्वीही मुंबईला दोन आयुक्त देण्याची मागणी झाली होती. त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही ही संकल्पना आवडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त देण्याची मागणी म्हणजे मुंबईला तोडण्याचा घाट आहे, अशी टीका भाजपने केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबईला तोडण्याचा कोणीही प्रयत्न करू शकणार नाही, असं सांगतानाच मुंबईच्या हितासाठी एकच आयुक्त असणं कधीही योग्यच असल्याचं ते म्हणाले.

मागे

भारतात गेल्या सात महिन्यात 33,000 टन कोव्हिड-19 कचरा, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
भारतात गेल्या सात महिन्यात 33,000 टन कोव्हिड-19 कचरा, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

भारतात गेल्या सात महिन्यात तब्बल 33 हजार टन कोव्हिड-19 जैव-वैद्यकीय कचरा (COVID-19 Waste....

अधिक वाचा

पुढे  

राज ठाकरेंचा रॉयल कारभार, सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात
राज ठाकरेंचा रॉयल कारभार, सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात

राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्य....

Read more