ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अटलबिहारी वाजपेयींचा बंगला अमित शाह यांना

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 07, 2019 01:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अटलबिहारी वाजपेयींचा बंगला अमित शाह यांना

शहर : मुंबई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा बंगला वास्तव्यासाठी दिला जाणार आहे. सरकारी सुत्रांनुसार, अटलबिहारी वाजपेयी यांचा कृष्णा मेनन मार्गावरील बंगला अमित शाह यांच्या वास्तव्यासाठी तयार केला जात असून काम सुरु करण्यात आलं आहे.

२००४ मध्ये सरकार सत्तेतून बाहेर पडल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी कृष्णा मेनन मार्गावरील बंगल्यात वास्तव्यास गेले होते. जवळपास १४ वर्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या कुटुंबासोबत तिथे वास्तव्य केलं. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्यानंतर कुटुंबाने नोव्हेंबर महिन्यात बंगला सोडला होता.

माजी पंतप्रधानांचा कृष्णा मेनन मार्गावरील अधिकृत बंगला अमित शाह यांना दिला जात आहे’, अशी माहिती सरकारी सुत्रांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री पदासोबत भाजपाध्यक्षदेखील असणाऱे

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर विजयाचे शिल्पकार असणारे अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्री पद देण्यात आलं आहे. सध्या ते ११ अकबर रोड येथील निवासस्थानी वास्तव्यास आहेत.

 

मागे

पाण्याचा अपव्यय केल्याने विराट कोहलीला दंड ठोठावला
पाण्याचा अपव्यय केल्याने विराट कोहलीला दंड ठोठावला

कोहलीच्या कार धुण्यासाठी डीएलएफ फेज-१ येथील त्याच्या राहत्या घराबाहेरील प....

अधिक वाचा

पुढे  

आंध्रमध्ये एकाचवेळी पाच उपमुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा निर्णय
आंध्रमध्ये एकाचवेळी पाच उपमुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांचा निर्णय

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत....

Read more