ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 10:31 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश

शहर : पुणे

कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकडेवारीचा विचार करुन पुणे प्रशासनाने पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात आता नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रातील जेष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलं यांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच दूध, भाजीपाला विक्री सुरु असणार आहे. कोणत्याही सोसायटीत कोरोना रुग्ण आढळला, तर तेथे 28 दिवसांसाठी मायक्रो कंटेनमेंट झोन असणार आहे. प्रशासनाने नवीन आदेश जारी करत या मार्गदर्शक सूचना दिल्या.

पुणेकरांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासादायक स्थिती देखील आहे. पुण्यात आतापर्यंत 10 हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकूण 10 हजार 451 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज करण्यात आले. एकूण रुग्णांच्या तुलनेत 61 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 17 हजार 228 झाला आहे. 350 रुग्ण अत्यस्थ असून विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागील 10 दिवसांमध्ये पुणे शहरात साडेपाच हजार 482 रुग्ण आढळले आहेत. तर याच 10 दिवसांमध्ये 132 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या कालावधीत प्रशासनाने 28 हजार 656 नागरिकांच्या कोरोना चाचणी केल्या. तसेच 2 हजार 734 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

असं असलं तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती आकडेवारी प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. त्याच पार्श्वभूमीवर ससून कोविड रुग्णालयात पुढील 6 महिन्यांच्या कालावधीत 710 पदांची भरती होणार आहे. यामध्ये परिचारिका, विविध तांत्रिक पदांसह, चतुर्थश्रेणी पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहेत. आऊटसोर्सिंगने सर्व पदे भरली जाणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

        

मागे

कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार
कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

समुद्रपूर तालुक्याच्या जाम येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला कोरोना....

अधिक वाचा

पुढे  

आता कोरोनाची चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही
आता कोरोनाची चाचणीसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही

कोरोनाव्हायरसची (Coronavirus) भीती आजकाल प्रत्येकाच्या मनात आहे. अनलॉकच्या परिचया....

Read more