ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2020 10:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30

डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार

शहर : मुंबई

डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण राज्यांनुसार बँकांना बंद असणार आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहार वेळेत पूर्ण करा. डिसेंबर २०२० मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. आता नवीन महिना आणि नवीन कामांच नियोजन सुरू झालं असेल. तर या नियोजनापूर्वी जाणून घ्या डिसेंबर महिन्याचं शेड्युल.

महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर असल्यामुळे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला रविवार असल्यामुळे देशभरातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे.

यानंतर १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि १३ डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे कामगाज बंद राहणार आहे. २० डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. त्यानंतर २४ अणि २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.

शिवाय २६ आणि २७ डिसेंबर रोजी चौथा शनिवार, रविवार असल्यामुळे सलग चार दिवस काम बंद राहणार आहेत. यामुळे बँकांशी संबंधीत सर्व काम वेळेत करून घ्या.

वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या सुट्या

गोव्यात १७ डिसेंबरला  लॉसोन्ग पर्व, १८ डिसेंबरला डेथ ऍनिव्हर्सरी यू सो थम आणि १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिन असल्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. तर ३० डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि ३१ डिसेंबरला इयर्स ईव असल्यामुळे काही राज्यामध्ये बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.

 

मागे

शेतकरी आंदोलकांकडून दिल्ली जाम करण्याचा इशारा; नड्डांच्या घरी रात्री उशिरा बैठक
शेतकरी आंदोलकांकडून दिल्ली जाम करण्याचा इशारा; नड्डांच्या घरी रात्री उशिरा बैठक

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण
मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्य....

Read more