ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘या’ लोकांना लस मिळणार नाही; राजेश टोपेचं मोठं वक्तव्य

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 13, 2021 11:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

‘या’ लोकांना लस मिळणार नाही; राजेश टोपेचं मोठं वक्तव्य

शहर : मुंबई

कोरोनाची लस (corona vaccine) ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे. 18 वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देता येणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

पुण्याच्या सीरम इन्सिट्यूटमधून निघालेला कोरोना लसींचा साठा राज्यातील आठ प्रमुख डेपोंमध्ये बुधवारी संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे. 15 तारखेच्या रात्रीपर्यंत या लसी ग्रामीण, जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल होतील. त्यानंतर 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठीशी बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला.

‘लसीकरणासाठी पुढाकार घ्या, अशिक्षित लोकांपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवा

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी लस घेण्यास नकार देऊ नये. तुम्ही लस घेऊन अशिक्षित लोक आणि ग्रामीण भागापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवला पाहिजे, असे आवाहन राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना केले.

राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रमक तीन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन आणि तिसऱ्या टप्प्यात व्याधी असणाऱ्या (को-मॉर्बिडिटी) असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाईल.

महाराष्ट्राला 9 लाख 63 हजार लसींचा साठा

महाराष्ट्रातील 55 टक्के लोकांना पुरेल इतका लसींच्या साठ्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, केंद्र सरकारकडून सध्या महाराष्ट्राला केवळ 9 लाख 63 हजार लसी देण्यात आल्या आहेत. यामध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या 20 हजार कुप्यांचा समावेश असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन डोस दिले जातील. यामध्ये 30 ते 45 दिवसांचे अंतर असेल.

कोरोनाच्या लसीमुळे कोणते साईड इफेक्टस होऊ शकतात?

कोरोनाची लस ही पूर्णपणे सुरक्षित आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काहीजणांना किरकोळ त्रास जाणवू शकतो. यामध्ये लस दिलेल्या भागात सूज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा लक्षणांचा समावेश आहे. तर काहीजणांना ताप येणे किंवा चक्कर येण्यासारखी सामान्य लक्षणे जाणवू शकतात. शरीराला खाज येणे किंवा घाम सुटणे ही लक्षणे सामान्य नसली तरी त्यामुळे जीवघेणा धोका उद्भवणार नाही, अशी हमी राजेश टोपे यांनी दिली.

मागे

भारताला मिळाली सर्वात स्वस्त वॅक्सीन, जाणून घ्या इतर देशांमध्ये किती आहे किंमत?
भारताला मिळाली सर्वात स्वस्त वॅक्सीन, जाणून घ्या इतर देशांमध्ये किती आहे किंमत?

भारताला जगातील सर्वात स्वस्त दोन लसी मिळत आहेत. सरकारने केलेल्या मोठ्या प्....

अधिक वाचा

पुढे  

नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड, समीर खान यांच्या घरी सर्च ऑपरेशन
नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड, समीर खान यांच्या घरी सर्च ऑपरेशन

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे जावई स....

Read more